एक्स्प्लोर
नारायण राणे काँग्रेसच नव्हे तर आमदारकीही सोडणार : सूत्र
21 सप्टेंबरला म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी भविष्यातली दिशा स्पष्ट करणार असल्याची घोषणा नारायण राणे यांनी 18 सप्टेंबरला सिंधुदुर्गात केली होती.
मुंबई : ज्येष्ठ नेते नारायण राणे आज काँग्रेस पक्षाला रामराम करुन आमदारकीचाही राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सिंधुदुर्गात आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत नारायण राणे घोषणा करणार असल्याचं कळतं.
21 सप्टेंबरला म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी भविष्यातली दिशा स्पष्ट करणार असल्याची घोषणा नारायण राणे यांनी 18 सप्टेंबरला सिंधुदुर्गात केली होती. ती मोठी घोषणा म्हणजे राणे काँग्रेस सोडून आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, नारायण राणे एकटेच काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचं कळतं. कालिदास कोलंबकर आणि नितेश राणे मात्र आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत. नाराय राणे हे काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आहेत.
परंतु राणे काँग्रेस सोडून भाजपत जाणार असल्याची चर्चा रंगली असली तरी ते आज यासंदर्भात घोषणा करणार का याची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
नारायण राणे आज कणकवलीतल्या बैठकीत काँग्रेस सोडण्याच्या ठराव मांडतील, त्यानंतर महाराष्ट्रभर दौरा काढून स्वतःच्या पक्षाबाबत अंतिम निर्णय घेतील, असं दिसतं. नारायण राणेंनी कणकवलीतल्या काँग्रेस कार्यालयात देवीची प्रतिष्ठापना करुन पूजा केली. त्यानंतर ते काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला जाण्यासाठी ओसरगावला निघाले.
संबंधित बातम्या
घटस्थापनेच्या मुहूर्तावर नारायण राणेंंची आज 'गट'स्थापना?
भाजपच्या साथीने नारायण राणे नवा पक्ष काढणार?
नारायण राणे एकटेच काँग्रेस सोडणार, नितेश आणि कोळंबकर पक्षातच
VIDEO : मला शिवसेनेकडूनही ऑफर, पण मी जाणार नाही : राणे
राणेंच्या ऐतिहासिक घोषणेला घटस्थापनेचा मुहूर्त!
...तोपर्यंत दाढी काढणार नाही : निलेश राणे
निलेश राणेंना अडीच लाख मतांनी हरवू: विनायक राऊत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement