एक्स्प्लोर

नितेश राणेंनी केलेली चिखलफेक चुकीची, नारायण राणेंचा माफीनामा

जर एखादा बाप स्वतःची चूक नसताना माफी मागू शकतो, तर मुलाला तर माफी मागावीच लागेल, असं म्हणत नारायण राणे यांनी माफी मागितली

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांविरोधातील रोष उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर काढणारे काँग्रेस आमदार नितेश राणे यांना वडील आणि खासदार नारायण राणे यांच्याच रोषाला सामोरे जावे लागत आहे. नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी उपअभियंत्यावर केलेल्या चिखलफेकीचा नारायण राणेंनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. नारायण राणेंनी लेकाच्या कृत्याबाबत माफीही मागितली आहे. नितेश राणे यांचं वर्तन चुकीचं होतं. मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या चिखल आणि खड्ड्याविरोधातील राग आणि आंदोलन समजू शकतो, मात्र नितेश यांच्या समर्थकांनी केलेली हिंसा चुकीची आहे. मी याला अजिबात पाठिंबा देत नाही, अशा शब्दात राणेंनी निषेध नोंदवला. मी त्याला माफी मागायला का सांगणार नाही? तो माझा मुलगा आहे. जर एखादा बाप स्वतःची चूक नसताना माफी मागू शकतो, तर मुलाला तर माफी मागावीच लागेल, असंही राणेंनी सांगितलं. नितेश राणे, स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलावर बांधलं. सर्वसामान्य जनता रोज जो चिखल मारा सहन करते, तो तुम्ही पण आज अनुभवा, असं म्हणत त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. संपूर्ण कणकवली तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवाल विचारत नितेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जाणवली पूलपर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांची वस्तुस्थिती दाखवली. शिवाय कार्यकर्त्यांनी शेडेकर यांना धक्काबुक्कीही केली. केसरकरांचा संताप आमदारांनी स्टंटबाजी करायची अन् त्यातून काम झालं, असं सांगत जनतेला फसवायचं. त्यामुळे जर त्यांना खर्‍या अर्थाने लोकांची कामं करायची असतील, तर अधिकारांना विश्वासात घेऊन करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांवर चिखल फेकणे, दादागिरी करणे चुकीचं आहे. त्यामुळेच आपल्या जिल्ह्यात कुठले अधिकारी किंवा कर्मचारी यायला बघत नाहीत. यातून जनतेचे हाल होतात ही प्रवृत्ती चुकीची आहे, अशा शब्दात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संताप व्यक्त केला. प्रकाश शेडेकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा सदर आमदारांवरसुद्धा चालू शकतो. पालकमंत्री म्हणून गेल्या आठ दिवसांपूर्वी मी तिथे गेलो होतो. महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारीही आले होते. त्यांच्यासोबत पाहणी केली आणि त्यांना पंधरा दिवसांची मुदत दिली होती. पंधरा दिवसात ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्या पूर्ण करण्याचे आदेश दिले होते, असं केसरकरांनी सांगितलं. नितेश राणेंनी अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीचं समर्थन विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं नसलं, तरी नितेश राणे यांचं टार्गेट  चुकीचं होतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर रस्त्याच्या दुरवस्थेकडे बोट दाखवताना कायदा कोणीही हातात घेऊ नये, असं आवाहन खासदार सुनिल तटकरे यांनी केलं.

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget