एक्स्प्लोर

Maharashtra Winter Temperature drops: नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर

Satpuda cold temperature:अक्कलकुवा शहरापासून सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या डाब या परिसराला आदिवासी भाषेत कडाक्याची थंडी पडत असल्यामुळे हेला दाब म्हणून ओळखले जाते.

Nandurbar: सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. नंदूरबारमध्ये गेल्या  तीन दिवसांपासून तापमानाच्या पाऱ्यात घसरण झालीय. घरातून बाहेर पडताच हात पााय सुन्न पडत असून सातपुड्याच्या अति दुर्गम भागातील तापमानाचा पारा घसरल्याने नागरिक कुडकुडले आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील डाब परिसर कडाक्याच्या थंडीने गारठला.वाहनांच्या टपांवर व गवतावर हिम चादर पसल्याचे दिसून आले.या भागातील स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास सपाटीपेक्षा सुमारे तीन ते चार अंशने तापमानात घट होते.मात्र, डाब परिसरात  4 ते 5 अंशादरम्यान तापमान असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

अक्कलकुवा शहरापासून सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या डाब या परिसराला आदिवासी भाषेत कडाक्याची थंडी पडत असल्यामुळे हेला दाब म्हणून ओळखले जाते. दरवर्षी या डाब परिसरातील गावपाड्यांमध्ये हिवाळ्यातील तापमान कमालीचे कमी होऊन प्रचंड थंडी जाणवते, पाणी गोठून बर्फ होतो. घराबाहेर लावलेल्या दुचाकी व चार चाकी वाहनांवरही हिम साचलेला दिसून येतो. तसेच माठातील पाणी गोठले जाते. सातपुड्यातील या डाब परिसराला अक्कलकुवा तालुक्यातील कुल्लू मनाली म्हणून ओळखले जाते.

शेतांमध्ये बर्फाची पांढरी चादर!

गेल्या दोन-तीन दिवसांपासून कडाक्याची थंडी वाढत असल्याने काल रात्री डाब, देवगोई, मौलीआडी पाडा, डाब, खोबरआंबापाडा, जुनवानी पाडा, देवगोईंपाडा परिसरात परिसरात जागोजागी गाड्यांच्या टपांवर व गवतावर हिमकण साचलेले दिसून आले.कडाक्याच्या थंडीनं सातपुड्यात नागरिकांच्या जननीवनावर परिणाम झाल आहे. दवबिंदू गारठल्याने सर्वत्र बर्फाची पांढरी चादर पसरली आहे.

Maharashtra Winter Temperature drops: नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर

येत्या दोन दिवसात तापमान घटणार

राज्यात येत्या दोन दिवसात किमान तापमानात कमालीची घसरण होणार असल्याचा हवामान विभागांना सांगितलं . उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात दोन ते चार अंश सेल्सिअसने तापमानात घट होण्याची शक्यता आहे . तर इतर ठिकाणीही हळूहळू तापमान घसरणार असल्याचं हवामान विभागाने वर्तवले .
Maharashtra Winter Temperature drops: नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर

जळगावात निचांकी तापमानाची नोंद

उत्तर महाराष्ट्र सध्या चांगला गारठलाय . किमान तापमानात कमालीची घट झाली असून मंगळवारी (10 Dec) जळगावात नीचांकी 8 अंशांची नोंद करण्यात आली . तर कमाल तापमान रत्नागिरीत सर्वाधिक 34.5 अंश  होते उत्तरेकडील शीत लहरी  महाराष्ट्रच्या दिशेन येत असल्याने नाशिकमधे कडाक्याची थंडी पडली आहे.  सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये तापमानात घसरण झाली. नंदूरबारच्या अक्कलकुवा, डाब, देवगोई, मौलीआडी पाडा, डाब, खोबरआंबापाडा, जुनवानी पाडा, देवगोईंपाडा परिसरात तापमान इतके कमी झाले होते की दवबिंदू गोठून घरांवर हिमकणांची चादर पसरली होती.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
Embed widget