धक्कादायक! नंदूरबारमध्ये कंटेनरमधून विदेशी बनावट दारुची तस्करी, पोलिसांची कारवाई, तब्बल 84 लाखांचा मुद्देमाल जप्त
नंदूरबारमध्ये (Nandurbar) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भर दिवसा लाल कंटेनरमधून विदेशी बनावट दारुची तस्करी ( foreign counterfeit liquor) होत असल्याची घटना उघड झाली आहे.
Nandurbar Crime News : नंदूरबारमध्ये (Nandurbar) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भर दिवसा लाल कंटेनरमधून विदेशी बनावट दारुची तस्करी ( foreign counterfeit liquor) होत असल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी दारु तस्करी करणाऱ्या राजस्थानच्या सुरेश बिश्नोईला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शहादा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर आत्तापर्यंतची सर्वात मोठी कार्यवाही करण्यात आली आहे.
तब्बल 84 लाख 12 हजारांचा मुद्द्यमाल केला जप्त
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या कार्यवाहीत तब्बल 84 लाख 12 हजारांचा मुद्द्यमाल केला जप्त करण्यात आला आहे. कंटेनरमध्ये विदेशी बनावटीचे 1 हजार 200 दारुची खोकी आढळून आली. दारू तस्करराविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
आधीच्या पालकमंत्र्यांनी दारुची दुकानं उघडली तर आत्ताचे पालकमंत्री संजय शिरसाटांनी जमीन घेतली : इम्तियाज जलील
























