एक्स्प्लोर

Nanded : नांदेडमधील नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थीनीची रॅगिंग; शिक्षक आणि विद्यार्थीनींविरोधात गुन्हा दाखल

Nanded Ragging : जातीभेदाच्या भावनेतून शिक्षक आणि हॉस्टेलमधल्या मुलींनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप नांदेडमधील नर्सिंग कॉलेजच्या हॉस्टेलमधील एका विद्यार्थीनीने केला आहे. 

नांदेड : जिल्ह्यातील हदगाव येथील पौळ नर्सिंग कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये रॅगिंगचा प्रकार घडल्याचं समोर आलंय. महाविद्यालयातील एक शिक्षक व इतर दोन विद्यार्थिनीनी त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची रॅगिंग केली आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षक आणि इतर दोन मुलींवर रॅगिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरातील गोविदराव पौळ नर्सिंग कॉलेजातील शिक्षक भगिरथ शिंदे आणि हॉस्टेलमधील दोन मुलींनी त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या व हॉस्टेलला राहत असणाऱ्या विशिष्ट समाजातील मुलीचे रॅगिंग केलं आहे. आपल्यासमोर नाक घास असं म्हणत त्या मुलींनी छेडछाड केल्याचाही प्रकार घडला आहे. पीडित मुलीला कपडे काढ, झाडू मार असा आदेश देत सगळी कामं जबरदस्तीनं करून घेऊन शारीरिक व मानसिक छळ करत रॅगिंग केल्याच उघड झालंय. 

पौळ नर्सिंग कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलमधील या कृत्याची तक्रार करण्यासाठी फर्यादी मुलगी जेव्हा भगीरथ शिंदे यांच्याकडे गेली असता त्यांनी वाईट उद्देशाने नको त्या भागाचा स्पर्श केला व तू हलक्या जातीची आहेस, तुला काम लावले तर काय झालं असं म्हटल्याचं त्या मुलीने आपल्या फिर्यादीत सांगितलं आहे. या प्रकरणाची इतर कुठे तक्रार केल्यास शैक्षणिक नुकसान करण्याची धमकीही दिली असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. 

या प्रकरणी  पोलिस ठाणे हदगाव  येथे गुन्हा क. रजिस्टर 253/2021 भादवी कलमानसार 354 सह अनुसुचित जाती जमाती अधिनियम प्र अधिकलम 3 (1) (आर) (डब्यलु) (1) (2) सह महाराष्ट्रात छळवणूक रॅगिंग प्रतिबंधक अधिनियम 1999 कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल

अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी

अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 

राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल

Embed widget