एक्स्प्लोर

तुमच्या 'क्रश'ला इंप्रेस करायचंय? मग 'या' सवयींपासून दूर रहा

कदाचित आपल्या काही सवयींमुळे मुलींना आकर्षित करणे, त्यांचं हृदय जिंकणं अनेक मुलांना जमत नाही. त्यामुळे त्यांना सिंगल रहावं लागतं. मग अशावेळी काही सवयींपासून मुलांनी दूर राहणं आवश्यक आहे. 

मुंबई : प्रेमात पडायला कुणाला नकोय? प्रत्येकाला किंवा प्रत्येकीलाच वाटतं की आपणही रिलेशनशीपमध्ये असावं, आपल्यालाही एक बॉयफ्रेन्ड वा गर्लफ्रेन्ड असावी. पण सगळ्याच क्षेत्रात वाढलेली स्पर्धा ही प्रेमाच्या क्षेत्रातही जरा जास्तच वाढलेली दिसून येते. त्यामुळे सध्याच्या घडीला रिलेशनशीपमध्ये असणं ही काही सोपी गोष्ट नाही. मुलांच्यासाठी तर ही गोष्ट अतिशय अवघड होत चालली असून एखाद्या मुलीचे मन  जिंकण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात हे ज्याचं त्यालाच माहिती आहे. अनेकदा मुलींचं किंवा आपल्या क्रशचं मन कसं जिंकावं हे मुलांना समजत नाही. 

आपण सिंगल असण्यामागे कदाचित आपल्या काही सवयी कारणीभूत असण्याची शक्यता आहे. या सवयींमुळे आपली क्रश आणि इतर  कोणतीच मुलगी आपल्याकडे आकर्षित होत नसेल. मुलींना मुलांच्या काही सवयी आवडत नाहीत. म्हणून अशा काही सवयींपासून मुलांनी दूर राहणं अत्यावश्यक ठरतं. त्या सवयी कोणत्या आहेत ते पाहू.

दारू आणि सिगारेटचे व्यसन
अलिकडच्या काळात मुलं ही मोठ्या प्रमाणावर व्यसनांच्या आहारी जाताना दिसतात. सिगारेटचे व्यसन आणि दारू या गोष्टी अनेकांमध्ये नॉर्मल होत आहेत. पण बहुतांश मुलींना या गोष्टींचा तिटकारा वाटतोय. व्यसनी मुलांपासून मुली या शक्यतो दूरच राहणं पसंत करतात. जर ही सवय तुम्हाला असेल तर आजच ती सोडा.

भांडखोर, चिडखोर
अनेक मुलांना नको तिथे आपली हिरोगिरी दाखवायची सवय असते. मग त्यातून ते सातत्याने भांडणं काढतात, मारामाऱ्या करतात, जाता-येता शिव्या कुणालाही शिव्या देतात, दादागिरी करतात. समाजाला उपद्रवकारक ठरणाऱ्या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त सहभागी होतात. पण कोणत्याही सभ्य मुलीला ही गोष्ट आवडत नाही. त्यामुळे आपण जर भांडखोर आणि चिडखोर असाल तर ही सवय आजच बंद करा. अन्यथा आपण सिंगल राहण्याची शक्यता आहे. 

शिव्या देणारे, अपमानजनक बोलणारे
जी मुलं सातत्याने अपशब्द वापरतात, शिव्या देतात, काहीही घाणेरडं बोलत राहतात अशा मुलांपासून मुली या दूरच राहणं पसंत करतात. एखाद्याच्या वयाचा विचार न करता जर कोणी त्याला अपमानजनक बोलत असेल किंवी आक्षेपार्ह भाषा वापरत असेल तर अशा मुलांपासून मुली दूर राहतात. जर मुलींचेमन जिंकायचं असेल तर सभ्य भाषेचा वापर करणं आवश्यक आहे. 

खोटारड्या मुलांपासून मुली दूर राहतात
आपल्यासोबत खोटं बोलणं हे कुणाही मुलीला किंवा महिलेला आवडत नाही. मग मुलगा खोटं बोलतोय म्हणून मुली रिलेशनशीप संपवण्यास मागे पुढे बघत नाहीत. तुम्ही कुठे आहात किंवा कोणासोबत आहात याबद्दल जर तुम्ही मुलींना खोटं सांगितलं तर मग सगळं संपलंच. तसेच तुम्ही कोणता जॉब करता, तुमच्या कुटुंबाची पार्श्वभू्मी काय आहे तसेच तुमचा भूतकाळ कसा आहे या गोष्टींची सत्य माहिती मुलींना अपेक्षित असते. या गोष्टींबद्दल जर तुम्ही खोटं बोलला तर तुमचे रिलेशनशीप कधीही संपू शकते हे नक्की. 

मग या आणि अशा अनेक वाईट सवयी जर तुम्हालाही असतील तर मग आजच त्या बंद करा. नाहीतर रिलेशनशीपची स्वप्न बघणाऱ्या तुम्हाला 'फॉरएव्हर सिंगल' रहावं लागेल हे नक्की. 

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
Hindu Religion : शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Shravan 2026 : भारतात श्रावण महिना दोन वेगवेगळ्या तारखांना का सुरू होतो? 'श्रावण' नावाची उत्पत्ती कशी झाली? वाचा यामागील काही रंजक गोष्टी
भारतात श्रावण महिना दोन वेगवेगळ्या तारखांना का सुरू होतो? 'श्रावण' नावाची उत्पत्ती कशी झाली? वाचा यामागील काही रंजक गोष्टी

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
Embed widget