एक्स्प्लोर

धक्कादायक! नांदेडमध्ये पोलिसांचं कॉम्बिग ऑपेरेशन, तब्बल 43 तलवारी पकडल्या, एकाला अटक 

Nanded Crime News : नांदेडमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कॉम्बिग ऑपेरेशनमध्ये नांदेड पोलिसांची 43 तलवार पकडल्या आहेत. या प्रकरणी एकाला अटक देखील करण्यात आली आहे.

Nanded Crime News :  नांदेडमध्ये पोलिसांनी (Nanded Police) मोठी कारवाई केली आहे. कॉम्बिग ऑपेरेशनमध्ये (combing operatio) नांदेड पोलिसांची 43 तलवार पकडल्या आहेत. या प्रकरणी एकाला अटक देखील करण्यात आली आहे.  नांदेडमध्ये 5 खून झाल्या नंतर पोलीस अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. आतापर्यंत 100 च्या वर कुख्यात गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.  

 31 तलवारी, खंजर 2 चाकू 10 असे 4 लाख 28 हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त

पुरुषोतम सिंग ग्रंथी असे नांदेड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.  31 तलवारी, खंजर 2 चाकू 10 असे 4 लाख 28 हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अवैध विक्रीसाठी ठेवला साठा होता. वजीराबाद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल (Case registered at Wazirabad Police Station) करण्यात आला आहे. 

सोशल मीडियाचा गैरवापर; पोलिसांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

सोशल मीडियाचा बेजबाबदार वापर किती घातक ठरू शकतो, याचं ताजं उदाहरण समोर आलं आहे. व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कोणाचीही बदनामी करणे किती गंभीर गुन्हा ठरू शकतो, याची जाणीव करून देणारी ही घटना आहे. 7 एप्रिल रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मारुती बावडेकर हे कर्तव्यावर असताना वसई बस डेपोच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका रिक्षाचालकाने अवैधरित्या वाहन उभे करून प्रवासी भरत होता. यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या बावडेकर यांना घाबरवण्याच्या उद्देशाने संबंधित रिक्षाचालकाने मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग सुरू केले. यावेळी त्याने पोलीस अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करत, मोठ्याने ओरडून त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला.  मात्र, बावडेकर यांनी संयम राखत आपले कर्तव्य पार पाडले. या घटनेचा व्हिडिओ नंतर कोणतीही खातरजमा न करता दोन यूट्यूब चॅनल्सनी दिशाभूल करणाऱ्या मजकुरासह प्रसारित केला. पोलीस 200 रुपयांत इमान विकतात अशा स्वरूपाच्या भ्रामक बातम्या देत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. यामुळे पोलीस दलाबाबत जनतेमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली.या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मारुती बावडेकर यांच्या तक्रारीवरून रिक्षाचालक रविंद्र जाधव तसेच यूट्यूब प्रतिनिधी शिवम दुबे आणि रवी पंडित यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 356 (2), 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून माणिकपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! कराडमध्ये सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा, सिग्नलमध्ये बिघाड करुन प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले, पोलिसांकडू तपास सुरु

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget