एक्स्प्लोर

Nanded Crime : लग्नासाठी पैसे मिळत नसल्याने बापाने पोटच्या मुलीला संपवलं

मुलीच्या लग्नासाठी पैशांच्या जुळवाजुळवीच्या विवंचनेत असणाऱ्या बालाजी देवकतेला आता लग्नासाठी शेती विकावी लागणार ही चिंताही सतावत होती.

नांदेड : मुलीच्या ठरलेल्या लग्नासाठी पैसे कुठून आणायचे. लग्नासाठी आता शेती विकावी लागणार, अशा विंवचनेतून बापाने पोटच्या मुलीला संपवल्याची घटना नांदेरमध्ये घडली आहे. बालाजी विश्वंभर देवकते (वय 40 वर्ष) असं या निर्दयी बापाचं नाव आहे. त्याने स्वतःची मुलगी सिंधूताई बालाजी देवकते (वय 18 वर्ष) हिच्या डोक्यात लाकडी बाजेचे गात (माचवा) घालून तिचा खून केला. मुखेड तालुक्यातील जामखेड इथे ही धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली.

बालाजी देवकते हा जामखेडमधील पाच एकर कोरडवाहू शेती असणारा अल्पभूधारक शेतकरी आहे. पत्नी, दोन मुलं आणि दोन मुली असा त्याचं कुटुंब आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून शेतातून हवे तसं उत्पन्न मिळालं नाही. त्यात कोरोना महामारी, महागाई यामुळे कुटुंब आणखीच आर्थिक अडचणीत आलं होतं. त्यातच सिंधुताई देवकते ही विवाह योग्य झाल्यामुळे तिच्या लग्नाची बोलणी झाली होती. मात्र लग्न तिथीनुसार तारीख मात्र निश्चित करण्यात आली नव्हती. मुलीच्या ठरलेल्या लग्नासाठी पैसे कुठुन जमा करायचे यावरुन बालाजी देवकते आणि त्यांची पत्नी यांच्यात खटके उडत होते. 

दरम्यान मुलीच्या लग्नासाठी पैशांच्या जुळवाजुळवीच्या विवंचनेत असणाऱ्या बालाजी देवकतेला आता लग्नासाठी शेती विकावी लागणार ही चिंताही सतावत होती. त्यातच लग्नासाठी पैसे जमा करु यावरुन बालाजी देवकते आणि पत्नी अहिल्याबाई यांच्यात भांडण सुरु झालं. यावेळी ते पत्नीला शिवीगाळ करुन वाद घालत होते. यावेळी हे भांडण सोडवण्यासाठी मुलगी सिंधुताई मध्ये पडली. परंतु यावेळी बालाजी देवकतेने रागाच्या भरात बाजेच्या लाकडी गातने ( माचवा)  मुलीच्या डोक्यात वार केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली, शिवाय रक्तस्त्राव अधिक झाल्याने ती जागेवरच गतप्राण झाली. तर पत्नी अहिल्याबाईलाही मारहाण झाल्याने ती जखमी झाली आहे.

अशाप्रकारे मुलीची हत्या आणि पत्नीला जखमी करुन आरोपी बालाजी देवकते मात्र पसार झाला आहे. दरम्यान मुखेड पोलीस ठाणे इथे मृत सिंधूताई देवकतेच्या आईच्या तक्रारीवरुन भादंवि कलम 124/2022, कलम 302, 324,506, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपी बालाजी देवकतेचा शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Embed widget