एक्स्प्लोर

नांदेड-संभाजीनगर रुग्णालयातील मृत्यू सरकारी हत्या; खुनाचे गुन्हे दाखल करा; पटोलेंची मागणी

Nana Patole : राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार लाजलज्जा सोडून दिलेले गेंड्याचे कातडीचे सरकार आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे: नाना पटोले

मुंबई : नांदेडमधील (Nanded) घटनेवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "सरकारकडे स्वतःचे गुणगान गाणारे इव्हेंट करण्यासाठी, जाहीरातबाजी करण्यासाठी आणि आमदार खरेदीसाठी पैसे आहेत. मात्र, सर्वसामान्य जनतेच्या औषधे खरेदीसाठी पैसे नाहीत का?, हे सरकारी अनास्थेचे बळी असून 302 चे गुन्हे दाखल करा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

यावेळी बोलतांना पटोले म्हणाले की, ठाण्यातील कळव्याच्या सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयामध्ये 48 तासांत 31 रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयामध्ये 24 तासांत दोन नवजात बालकांसह 10 जणांचा मृत्यू, या संताप आणणाऱ्या घटना आहेत. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार लाजलज्जा सोडून दिलेले गेंड्याचे कातडीचे सरकार आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. औषधे नसल्याने हे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे हे अत्यंत चीड आणणारे आहे. 

40 टक्क्यांची मलई खाण्यासाठी वेळेत औषधी खरेदी केली नाही

यासंदर्भात भाजपाप्रणित राज्य सरकारवर तोफ डागत नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला भ्रष्टाचाराच्या भस्म्या रोग झाला असून, संपूर्ण यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे. सरकारी रुग्णालयात पुरेसे डॉक्टर व कर्मचारी नाहीत, औषधांचा तुटवडा आहे. रुग्णालयातील यंत्रसामुग्री नादुरुस्त असल्याने धुळ खात पडलेली आहे. मोठ्या शहरामध्ये आरोग्य सेवांची ही अवस्था आहे. तर ग्रामीण रुग्णालयातील अवस्था काय असेल याची कल्पना न केलेली बरी. शासकीय रुग्णालये मृत्यूचे सापळे झाले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने 40 टक्क्यांची मलई खाण्यासाठी वेळेत औषधी खरेदी केली नाही. त्यामुळे 2022  मध्ये तरतूद केलेला 600 कोटींचा निधी परत गेला. भाजपा सरकारने 15 ऑगस्टपासून राज्यात मोफत आरोग्य सेवा सुरु केल्याचा मोठा गाजावाजा केला पण रुग्णालयात सरकार सेवा देत नसून मृत्यू देत आहे. भाजपा सरकारच्या काळात मरण स्वस्त झाले आहे हेच यावरून दिसत असल्याचे पटोले म्हणाले. 

मंत्र्यांची हकालपट्टी करावी

मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या ठाणे शासकीय रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात एकाच रात्री 18 मृत्यू झाले, त्यावर चौकशी समिती नेमली गेली त्या समितीचे काय झाले? एखांद्या डॉक्टर वा वैद्यकीय कर्मचाऱ्याला निलंबित करुन हे प्रकार थांबणार नाहीत. संबंधित मंत्री आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. सर्वसामान्य जनतेचे मृत्यू होत असताना संबंधित खात्याचे मंत्री काय करतात? मुख्यमंत्र्यांमध्ये थोडीशी संवेदना शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांची हकालपट्टी करावी असेही पटोले म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Rohit Pawar Nanded Hospital Tragedy : नांदेड मृत्यू प्रकरण! आरोग्यमंत्र्यांनी आजचं राजीनामा द्यावा; रोहित पवारांची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Embed widget