(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded Nagar Panchayat Election : नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची बाजी, दोन नगरपंचायतींवर काँग्रेस तर एका ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता
नांदेड जिल्ह्यात (Nanded Ardhapur, Naygaon, Mahur Nagar panchayat Election Result) अर्धापूर (Ardhapur Nagar panchayat) नायगाव, माहूर नगरपंचायतीचा निकाल हाती आला आहे.
Nanded Ardhapur Naygaon mahur Nagar Panchayat Election Result : आज राज्यातील 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतीच्या 336 जागांसाठी काल निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. आज या जागांचा निकाल लागला. नांदेड जिल्ह्यात (Nanded Ardhapur, Naygaon, Mahur Nagar panchayat Election Result) देखील अर्धापूर (Ardhapur Nagar panchayat) नायगाव, माहूर नगरपंचायतीचा निकाल हाती आला आहे. यापैकी अर्धापूर ,नायगाव (Naygaon Nagar Panchayat) नगरपंचायतीवर काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे तर माहूर नगरपंचायतीवर (Mahur Nagar panchayat) महाविकास आघाडीची सत्ता आली आहे.
Nagar Panchayat Elections 2022 Result Live : नगरपंचायत, झेडपीचा रणसंग्राम; आज निकाल, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
अर्धापूर नगरपंचायत निवडून आलेले उमेदवार
वॉर्ड क्र-1
शालिनी राजेश्वर शेटे (काँग्रेस विजयी)
वॉर्ड क्र-२
बाबुराव लंगडे (भाजपा विजयी)
वॉर्ड क्र-३
शेख जाकेर (राष्ट्रवादी)
वॉर्ड क्र-४
डॉ.पल्लवी विशाल लंगडे (काँग्रेस)
वॉर्ड क्र-५
कान्होपात्रा प्रल्हाद माटे (भाजपा)
वॉर्ड क्र-६
सोनाजी सरोदे (काँग्रेस )
वॉर्ड क्र-७
छत्रपती कानोडे (काँग्रेस)
वॉर्ड क्र-८
वैशाली प्रवीण देशमुख (काँग्रेस)
वॉर्ड क्र-९
मिनाक्षी व्यंकटी राऊत (काँग्रेस)
वॉर्ड क्र-१०
मुख्तेदर खान पठाण (अपक्ष)
वॉर्ड क्र-११
साहेरा बेगम काजी (काँग्रेस)
वॉर्ड क्र-१२
यास्मिन सुलताना मुसब्बीर खतीब (काँग्रेस)
वॉर्ड क्र-१३
मिर्झा शहबाज बेग(एमआयएम)
वॉर्ड क्र-१४
रोहिणी इंगोले (एमआयएम)
वॉर्ड क्र-१५
आतिख रेहमान (एमआयएम)
वॉर्ड क्र-१६
सलीम कुरेशी (काँग्रेस)
वॉर्ड क्र-१७
नामदेव सरोदे (काँग्रेस)
अर्धापूर नगरपंचायत अंतिम निकाल
काँग्रेस-10
राष्ट्रवादी-1
भाजपा-2
MIM-3
अपक्ष-1
नायगाव नगरपंचायत अंतिम निकाल
नायगाव नगरपंचायत मध्ये भाजपा आमदार राजेश पवारांना मोठा धक्का बसलाय. कारण नायगाव मतदारसंघाचे आमदार असणाऱ्या पवारांच्या पारड्यात एकही विजय पडला नाहीये. कारण याठिकाणी 17 च्या 17 जागांवर कोंग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आलीय.
माहूर नगरपंचायतमध्ये महाविकास आघाडीने आपली सत्ता कायम ठेवली आहे.
याठिकाणी
काँग्रेस-5
शिवसेना-3
राष्ट्रवादी-6
भाजप-1
अपक्ष-2
असे पक्षीय बलाबल ठेवत महाविकास आघाडीने सत्ता आपल्या हातात घेतली आहे. तर या तीन नगरपंचायत पैकी अर्धापुर नगरपंचायतमध्ये नव्याने MIM ने आपले खाते उघडलेय. तर तीन नगर पंचायतमधील 51 जागेत भाजपला फक्त 3 जागेवर समाधान मानावे लागलेय.तर काँग्रेसने नायगाव व अर्धापुर या दोन नगरपंचायतवरील 25 वर्षाची आपली एक सत्ता कायम ठेवलीय.
इतर महत्वाच्या बातम्या