Nana Patole on BJP : भाजपची काळी जादू चालणार नाही : नाना पटोले
Nana Patole on BJP : भाजपाच्या हातून सत्ता गेल्यानंतर भाजपची काळी नजर महाविकास आघाडी सरकारवर आहे. मात्र भाजपची काळी जादू चालणार नसून सरकार 5 वर्ष चालणार असल्याच्या विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
Nana Patole on BJP : सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीवर भाजपची काळी नजर असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. भाजपची काळी जादू चालणार नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी टोलाही लगावला आहे. तसेच, राज्यातील आघाडीची सत्ता 5 वर्ष टिकेल, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, भाजपाच्या हातून सत्ता गेल्यानंतर भाजपची काळी नजर महाविकास आघाडी सरकारवर आह. मात्र भाजपची काळी जादू चालणार नसूनही सरकार 5 वर्ष चालणार असल्याच्या विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. ते भंडाऱ्यात आयोजित सायकल परेड दरम्यान बोलत होते.
सरकार राष्ट्रावादी (NCP) चालवत असून काँग्रेस सेना बघाची भूमिका घेत असल्याच्या आरोपांबाबत बोलताना ते म्हणाले की, "भाजपचं पहाटे आलेलं सरकार गेल्यानं भाजप तडफडत आहे. आमची सत्तेत भागीदारी असून कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सरकार काम करत आहे. याचा त्रास विरोधकांना होत असून त्यांची काळी नजर असल्याचा आरोप नाना पटोली यांनी केला आहे. त्यामुळे भाजपची काळी जादू चालणार नसून ही सत्ता 5 वर्ष चालेल.", असं मत नाना पटोले यांनी मांडलं आहे.
पाहा व्हिडीओ : भाजपची काळी जादू चालणार नाही, ही सत्ता 5 वर्ष चालेल : नाना पटोले
बँकेचे नियम धाब्यावर बसवून बँकेत घोटाळा झालाय, दरेकरांवर कारवाई व्हावी : नाना पटोले
बँकेचे नियम धाब्यावर बसवून मुंबई बँकेत हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे दरेकरांवर कारवाई व्हावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. बँक घोटाळा प्रकरणात प्रवीण दरेकरांचा मुंबई सेशन कोर्टात जामिन फेटाळला नंतर दरेकर जामिनासाठी उच्च न्यायालयात गेले. आज त्यावर सुनावनी होणार आहे. यावर नाना पटोले यांनी वक्तव्य केलं आहे. मुंबई बँकेत घोटाळा झाला असून लेखा परीक्षणामध्ये तसा अहवाल आला आहे. त्याचे मुख्य सूत्रधार प्रविण दरेकर असल्याचं स्पष्ट मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Dilip Walse Patil : राज्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी! 188 अंतर्गत दाखल गुन्हे गृह विभाग मागे घेणार
- Aaditya Thackeray : यशवंत जाधव यांच्या डायरीतील 'मातोश्री' उल्लेखावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले...
- Aaditya Thackeray : नाणार रिफायनरीचं काय होणार? पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले...