मोठी बातमी : नाना पटोलेंचे निर्णयाचे अधिकार काढले, प्रकाश आंबेडकरांच्या पत्रानंतर काँग्रेसमध्ये खळबळ
Prakash Ambedkar Letter To Nana Patole : प्रकाश आंबेडकरांच्या पत्रानंतर त्यावर राष्ट्ववादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही स्पष्टीकरण दिलं असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निर्णयाचे अधिकार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीमध्ये आणि इंडिया आघाडीमध्ये कुणाचा घ्यायचं आणि कुणाला नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना नसल्याचं समोर आलं आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) यासंबंधी एक पत्र लिहिलं होतं. त्यांच्या या पत्रानंतर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार हे नाना पटोलेंना नसून अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना असल्याचं समोर आलं आहे.
राज्यातील महाविकास आघाडीमध्ये वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी सामील व्हावं, तशा आशयाचं पत्र आंबेडकरांना पाठवण्यात आलं होतं. त्या पत्रावर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सहीचा समावेश होता. मात्र मविआच्या या पत्रानंतर प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर ही बाब समोर आली.
मविआच्या बैठकीनंतर जयंत पाटलांचे स्पष्टीकरण
लोकसभेच्या जागावाटपासंबंधी महाविकास आघाडीची आज एक बैठक झाली. त्यावेळी नाना पटोले यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाहीत हे जयंत पाटलांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांना फोन केला. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या समस्या मांडल्या तेव्हा जयंत पाटील यांनी AICC चे महाराष्ट्र प्रभारी रमेश चिन्नाथला यांनाही कॉलवर जोडले. रमेश चिन्नाथला आणि जयंत पाटील या दोघांनीही नाना पटोले यांना MVA आणि INDIA मध्ये निर्णय घेण्याचा अधिकार नाही हे मान्य केले. महाराष्ट्रासाठी निर्णय घेण्याचे अधिकार बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना देण्यात आले आहेत.
नाना पटोले काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोले यांना निर्णयाचे काही अधिकार नसून ते जनतेची दिशाभूल करतात अशी टीका केली होती. त्यानंतर त्यावरल नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांचं समाधान झालं आहे . 30 तारखेला ते आमच्यासोबतच मिटिंगमध्ये येतील. त्यांचे प्रतिनिधी देखील असतील. आता त्यांचा जो गैरसमज होता तो दूर झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीमध्ये वंचितचा समावेश करण्याबाबत चर्चा सुरू होत्या. त्यासंबंधी दिल्लीमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची बैठकही झाली होती. त्यासंबंधी आजच्या बैठकीतही चर्चा झाल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा: