एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नागपुरात आजपासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन
नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात होत आहे. पण अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधक आणि सत्ताधाऱ्यांणध्ये कार्टून वाद रंगला आहे.
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची तुलना थेट कार्टूनशी केली आहे. सरकार म्हणजे डोरेमॉन आणि जनता म्हणजे नोबिता असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं.
काल विरोधकांनी नागपुरात संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. भ्रष्टाचार, नोटबंदी या मुद्द्यांवरुन सरकारला धारेवर धरत सरकारच्या कार्यक्षमतेवरही राधकृष्ण विखे-पाटलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
सरकारला डोरेमॉनची उपमा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. विरोधकांचा 'मोगली' झाल्याचा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसंच विरोधक अजूनही प्रगल्भ नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या शाब्दिक युद्धामुळे हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची चिन्ह आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement