एक्स्प्लोर
श्रेयवादाची लढाई, नागपुरातील क्रीडासंकुल अडीच वर्ष कुलूपबंद
क्रीडा संकुलावर कुणाच्या नावाचा झेंडा रोवायचा यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे.
नागपूर : जगप्रसिद्ध लेखक शेक्सपियर म्हणाले होते "व्हॉट इज इन नेम?" सध्या नागपुरातील वैशालीनगर परिसरातल्या नागरिकांनाही हाच प्रश्न पडला आहे. कारण राजकारण्यांनी आपापल्या नेत्यांचं नाव देण्यासाठी एक क्रीडा संकुल गेल्या अडीच वर्षांपासून कुलूपबंद ठेवलं आहे.
क्रीडा संकुलावर कुणाच्या नावाचा झेंडा रोवायचा यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे. 2010 मध्ये सुरु झालेलं क्रीडासंकुलाचं काम 2015 मध्ये पूर्ण झालं. मात्र सत्तांतर झालं आणि जनतेच्या चार कोटी 33 लाख रुपयांतून उभ्या राहिलेल्या क्रीडासंकुलाचे दशावतार सुरु झाले.
नागपुरातील सर्वात मोठे स्विमिंग पूल, योगा केंद्र, वातानुकूलित व्यायाम कक्ष, स्केटिंग रिंग, बास्केटबॉल मैदान अशा सोयी-सुविधा या संकुलात आहेत. क्रीडा संकुलाला राजीव गांधींचं नाव देण्याची मागणी काँग्रेसनं लावून धरली आहे. त्याचवेळी भाजपनं निवडणुकांच्या तोंडावर क्रीडासंकुलाचं उद्घाटन करण्याचा मुहूर्त साधला.
संकुलाला एखाद्या खेळाडूचं नाव देण्याचा आग्रह भाजपनं लावून धरला. गल्लीबोळात आपलं नशीब आजमवणाऱ्या खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी पंतप्रधान मोदींनी खेलो इंडिया मोहिमेला पाठिंबा दिला. मात्र नावाचा खेळ करणाऱ्या राजकारण्यांनी खेळाच्या मैदानांना राजकारणापासून दूर ठेवायला हवं. तरंच एका सुदृढ आणि निरोगी पिढीची आशा करता येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement