एक्स्प्लोर
नागपूर पोलिसांचा शौचालय घोटाळा, 1 लाखांची रंगरंगोटी

नागपूर : आजवर तुम्ही आदर्श घोटाळा, चारा घोटाळा असे अनेक घोटाळे ऐकले असतील पण कधी शौचालय घोटाळा ऐकला आहे का... कानाला नवीन वाटणारा गफला केला आहे नागपूरच्या पोलिसांनी. ज्यांच्यावर भ्रष्टाचाऱ्यांना जेरबंद करण्याची जबाबदारी आहे, तेच नागपूरचे पोलिस आता एका नव्या घोटाळ्यात अडकले आहेत. शौचालयाच्या बांधकामासाठी तब्बल 1 लाख रुपये खर्च झाल्याचा कागदोपत्री पुरावा नागपूरच्या वाडी पोलिसांकडे आहे. धक्कादायक बाब म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून त्या बिलाला मंजुरी देण्यात आली. या प्रकरणाचा खोलवर तपास केला, तेव्हा समजलं की या एक लाख रुपयांमधून पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाची रंगरंगोटी करून घेतली आणि सोबतच काही टेबल खुर्च्या विकत घेतल्या. एकीकडे स्वच्छता मोहिमेच्या नावाखाली शौचालय न बांधता पैसे उकळणाऱ्या 18 कुटुंबांच्या विरोधात कारवाया झाल्या आहेत. त्यामुळे आता पोलिसांवर असी धाड कधी पडणार हा प्रश्न आहे.
Before You Go
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















