एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nagpur : दोन वर्षांपूर्वीची डेडलाईन संपली; निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहाचे काम रखडले

तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नागपूर दौऱ्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी नवीन इमारतीबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही दिले तरी कामाला सुरुवात झाली नाही.

Nagpur News :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (government medical college nagpur) व रुग्णालयातील वसतिगृहांचे काम रखडल्याने निवासी डॉक्टरांच्या (Resident Doctors) निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जुन्या वसतीगृहांची अवस्था आणि उपलब्ध खोल्यांची संख्या मर्यादित असतानाच दरवर्षी पदव्युत्तरच्या जागा मात्र वाढत आहेत. अशा स्थितीत प्रवेश घेणाऱ्या निवासी डॉक्टरांना निवाऱ्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे.  मेडिकल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स मिळून निवासी डॉक्टरांची एकूण संख्या 572 आहे. मार्डसाठी (Maharashtra State Association of Resident Doctors) सहा क्रमांकाचे वसतीगृह आणि सुपरच्या निवासी डॉक्टरांसाठी 27 खोल्यांचे वसतिगृह आहे. मात्र, आता ही वसतीगृहे अपूरी ठरली आहेत.

एका खोलीत 3 डॉक्टरांना राहावे लागत असल्याची स्थिती आहे. मार्ड वसतीगृहाची इमारत जुनी झाल्याने जीर्ण होत चालली आहे. यासोबतच गटारांसह अन्य समस्याही निर्माण होऊ लागल्या आहेत. गतवर्षी तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री (Minister of Medical Education) जितेंद्र आव्हाड यांनी नागपूर दौऱ्यावर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी नवीन इमारतीबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश अधिष्ठातांना दिले होते. वैद्यकीय बांधकाम समितीने वसतीगृहाची पाहणी करून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. सततच्या पाठपुराव्यानंतर निवासी डॉक्टरांसाठी चार मजली इमारतीत 250 खोल्यांची व्यवस्था करण्याचे नियोजन सरकारने केले होते.

नियोजित नवीन वसतीगृहाबद्दल...

  • 250 खोल्यांचे नवे वसतीगृह
  • 28 कोटींचा निधी मंजूर
  • 2020 मध्येच अपेक्षित होते हस्तांतरण

निधी मंजूर तरीही कामांना 'ब्रेक'

वसतीगृहासाठी 28 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या पश्चिम भागात वसतिगृहाच्या बांधकामासाठी जागाही निश्चित करण्यात आली होती. निधीचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर बांधकामालाही सुरुवात झाली. मार्च 2020 पर्यंत ही इमारत तयार होऊन हस्तांतरित होणे अपेक्षित होते. परंतु, 2019 मध्ये कोरोनाच्या उद्रेकामुळे बांधकामाला ब्रेक लागला. तेव्हापासून काम रखडले आहे. बांधकामासाठी 7 कोटींहून अधिक खर्च झाला आहे. मार्च 2022 मध्ये इमारतीचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, अद्यापपर्यंत इमारत अपूर्ण आहे. दरवर्षी पदव्युत्तरच्या जागा वाढत आहेत. नुकतेच नवीन जागांना मंजुरी देण्यात आली आहे. या स्थितीत नवीन निवासी डॉक्टरांच्या राहण्याचा प्रश्न गंभीर ठरला आहे. इमारतीचे बांधकाम केव्हा पूर्ण होणार, हे बांधकाम विभागही सांगण्यास तयार नाही. निधी न मिळाल्याचे कारण सांगितले जात आहे, मात्र इमारत बांधकामासाठी यापूर्वीच निधी मंजूर असताना आता निधीअभावी हा विषयच उद्भवत नाही.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
IPL Mega Auction 2025: IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
Prajatka Mali: पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha at 730AM 26 November 2024 माझं गाव, माझा जिल्हा #abpमाझाTop 80 At 8AM 26 November 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या #ABPmajhaABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 26 November 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सSpecial Report - Eknath Shinde : 57 जागा जिंकणाऱ्या शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळणार? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
IPL Mega Auction 2025: IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
Prajatka Mali: पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
Maharashtra CM: महायुतीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी अमित शाह मुंबईत येणार, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता, शिंदे समर्थकांनी देव पाण्यात ठेवले
महायुतीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी अमित शाह मुंबईत येणार, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता, शिंदे समर्थकांनी देव पाण्यात ठेवले
आता घरबसल्या मिळवा तुमच्या गाडीचा VIP नंबर; अर्ज कसा करायचा? किती पैसे लागणार?
आता घरबसल्या मिळवा तुमच्या गाडीचा VIP नंबर; अर्ज कसा करायचा? किती पैसे लागणार?
Jitendra Awhad on EVM: जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Embed widget