Nagpur : रात्री झाडीपट्टीचं नाटक पाहिलं अन् पहाटे स्वत: सरण रचून आयुष्य संपवलं!
Nagpur News Updates : नागपूर जिल्ह्यात आत्माराम मोतीराम ठवकर (80 वर्ष) या वृद्धाने त्यांच्या मुलाचा गॅस गोडाऊन असलेल्या शेतात एका बाजूला स्वतःच सरण रचून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Nagpur News Updates : नागपूर जिल्ह्यातून (Nagpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वृद्धाने स्वतः सरण रचून पेटवून घेत आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील किन्ही गावात आत्माराम मोतीराम ठवकर (80 वर्ष) या वृद्धाने त्यांच्या मुलाचा गॅस गोडाऊन असलेल्या शेतात एका बाजूला स्वतःच सरण रचून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
मृतक आत्माराम वारकरी, धार्मिक वृत्ती
महाशिवरात्रीच्या दिवशी (1 मार्चला) किन्ही गावाबाहेर असलेल्या मुलाच्या शेतात आत्माराम ठवकर यांनी आत्महत्या केल्याचे काल उघडकीस आले. मृतक आत्माराम हे वारकरी होते. धार्मिक वृत्तीचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी असायचे.
काल रात्री त्यांनी गावात मंडई निमित्त सुरू असलेले झाडीपट्टीतील नाटकाचा आनंद घेतला होता. पहाटे पाच वाजता शेताकडे गेले आणि शेतात असलेले लाकडं एकत्र करून सरण रचले, त्यावर तनस (गवत) टाकलं आणि त्यावर बसून सरण पेटवून घेत आत्महत्या केली. सकाळी त्यांचे पार्थिव अर्धवट जळालेल्या अवस्थेत गावकऱ्यांना मिळाले.
आत्महत्या आहे की घातपात?
वेलतुर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. दरम्यान आत्माराम ठवकर यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणी पानाचा एक विडा आणि दिवा आढळून आल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. ही घटना खरंच आत्महत्या आहे की घातपात आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- रशियाच्या मदतीला 'हिवाळा'! इतिहास सांगतोय... हिवाळ्याच्या मदतीने रशियाने अनेक शत्रूंना लोळवलंय
- SWIFT : रशियाच्या आर्थिक नाड्या आवळणारा SWIFT निर्बंध आहे तरी काय?
- Russia Ukraine War : कॅनडाकडून रशियन तेल आयातीवर बंदी, पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले...