एक्स्प्लोर

Pune Crime News : मोबाईल कॅमेऱ्यातून बघायचा भक्तांचे खासगी क्षण, वेश्यागमन, ॲपद्वारे ठेवायचा नजर; पुण्यात भोंदूबाबाला ठोकल्या बेड्या

Pune Crime News : हिडन मोबाईल अ‍ॅपद्वारे भक्तांच्या खाजगी आयुष्यावर नजर ठेवणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे.

Pune Crime News : हिडन मोबाईल अ‍ॅपद्वारे भक्तांच्या खाजगी आयुष्यावर नजर ठेवत त्यांचा मानसिक आणि आर्थिक छळ करणाऱ्या एका भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी (Bavdhan Police) अटक केली आहे. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार (वय 29) असं या भोंदू बाबाचं नाव असून, तो स्वतःकडे 'दिव्यशक्ती' असल्याचा दावा करत अनेकांशी फसवणूक करत होता. (Pune Crime News)

या प्रकरणी एका 39 वर्षीय व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, या भोंदू बाबांना त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याच भासवत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले. या भोंदू बाबाने फिर्यादीच्या मोबाईलमध्ये एक हिडन ॲप डाऊनलोड करत त्याद्वारे मोबाईलचा ऍक्सेस मिळवला. फिर्यादी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या घटनांवर लक्ष ठेवले.  एवढेच नाही तर फिर्यादीला अश्लील कृत्य, त्याच बरोबर वेश्यागमन करण्यासही भाग पाडले आणि मोबाईल ॲपद्वारे ते पाहिल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आलं आहे. समावेश होता.

भोंदूबाबा पोलिसांच्या जाळ्यात

या भोंदू बाबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादित सांगण्यात आलं आहे. फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांची या भोंदू बाबाने फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. यानंतर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांनी प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार याला अटक केली आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपी बाबाच्या मोबाईल आणि वापरलेल्या अॅपची कसून चौकशी करण्यात आली आहे. भक्तांचे चित्रीकरण कोठे साठवले जात होते, याचा शोध घेण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान,  अशा प्रकारच्या बाबांपासून सावध राहावे. कोणतीही अंधश्रद्धा ठेवू नये आणि आपली गोपनीय माहिती किंवा मोबाईल कोणालाही देऊ नये. तसेच, बाबाने फसवणूक केली असल्यास घाबरून न जाता समोर येऊन तक्रार द्या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड

दरम्यान, पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात आज (२८ जून) पहाटे अज्ञात टोळक्याने 17 गाड्यांची तोडफोड केली. ही घटना सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडली. दारूच्या नशेत ही तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

आणखी वाचा

Chhatrapati Sambhajinagar Crime : वैजापुरात आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराला संपवलं, मंदिराच्या पुजार्‍यांनी आवाज दिला, शेडमध्ये बघितले अन्...; नेमकं काय घडलं?

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकाचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकाचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget