एक्स्प्लोर

Neeraj Singh: मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांना लुटणाऱ्या नीरज सिंह राठोडच्या सीडीआरमध्ये 28 आमदारांचे मोबाईल नंबर

Nagpur News: महाराष्ट्र, गोवा आणि नागालँडसह पश्चिम बंगाल व झारखंड या राज्यातील काही आमदारांचे मोबाईल क्रमांक मिळाले आहेत.

नागपूर : मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे  आरोपी नीरज सिंह राठोड यांने तब्बल 28  आमदारांची फसवणूक केल्याची माहिती नागपूर पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे नीरज सिंहच्या सीडीआरमध्ये 28 आमदारांचे फोन नंबर आढळून आले असून त्यातील तीन आमदारांनी ऑनलाईन पैसे पाठवल्याचंही तपासात समोर आले आहे.  महाराष्ट्र, गोवा आणि नागालँडसह पश्चिम बंगाल व झारखंड या राज्यातील काही आमदारांचे मोबाईल क्रमांक मिळाले आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सारखा आवाज काढून नीरज सिंहने आमदारांची फसवणूक केली. नीरज सिंह यांच्या आवाजामुळे भाजपच्या अनेक आमदारांना मंत्रिपदाची भुरळ पडली होती. फेब्रुवारी 2023 पासून अगदी काल परवापर्यंत महाराष्ट्रातील भाजपच्या अनेक आमदारांना निरज सिंह राठोड नावाच्या एका व्यक्तीचे फोन येत होते. तो स्वतःला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा स्वीय सहाय्यक सांगत असे.  महाराष्ट्रातील भाजप आमदारांना तुम्हाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्याचे ठरले आहे असे सांगायचा. एवढचं नाही तर  तुम्हाला कोणता मंत्रिपद हवा आहे याची विचारणा देखील करायचा.

भाजप आमदार विकास कुंभारे यांना 7 मे पासून  काही दिवस सतत नीरज सिंह राठोड याचे फोन येत होते. सुरुवातीला विकास कुंभारे यांचा आपल्याला खरंच राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यालयातून फोन येत आहे असंच वाटलं. मात्र नंतर मंत्रिपदाच्या मोबदल्यात पैशाची मागणी होऊ लागल्यामुळे विकास कुंभारे यांना शंका आली. त्यांनी चौकशी केली  असता हा त्यांना लुबाडण्याचा प्रकार असल्याचे लक्षात आलं. त्यानंतर कुंभारे यांनी नागपूर पोलिसांकडे रीतसर तक्रार दिली  फेब्रुवारी महिन्यात नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघाचे भाजप आमदार टेकचंद सावरकर यांच्यासोबत ही घडले होते. त्यांना  एका गरीब भाजप नेत्याला मदत करण्याच्या नावाखाली मंत्रिपदाच्या मोबदल्यात पैशाची मागणी करण्यात आली होती. 

 एक नव्हे तर अनेक आमदारांची अशाच पद्धतीने फसवणूक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नागपूर पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर नागपूर पोलिसांनी नीरज सिंह राठोड या भामट्याचा फोन सर्विलंन्स वर ठेवला.  तो गुजरातमधील मोरबी मध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि नागपूर पोलिसांच्या पथकाने काल संध्याकाळी त्याला मोरबी मधून ताब्यात घेतले.  नी

नीरज सिंह राठोड या भामट्याने याच पद्धतीने महाराष्ट्रातील भाजप आमदार नारायण कुचे, राजेश पाडवी यांच्यासह गोव्यातील भाजप आमदार प्रवीण आगलेकर आणि नागालँड मधील भाजप आमदार मोवा चेंग यांची ही फसवणूक करण्याचे प्रयत्न केले असल्याची माहिती आहे. नीरज सिंह यांच्यावर अशाच पद्धतीने आधीही फसवणूक केले असल्याचे गुन्हे दाखल आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
Ind vs Aus 4th Test Day-3 : तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh on Santosh Deshmukh Case : तपासावर समाधानी नाही, मारेकऱ्यांना तात्काळ अटक कराTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 28 डिसेंबर 2024 : ABP MajhaSambhaji Raje on Santosh Deshmukh Case : Dhananjay Munde यांनी राजीनामा द्यावा ; संभाजीराजेTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
Ind vs Aus 4th Test Day-3 : तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर
पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Embed widget