एक्स्प्लोर

मुनगंटीवारांच्या वृक्ष लागवडीवर नागपूर मनपाने जेसीबी चालवला

नागपूर: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठ्या गाजावाजाद्वारे केलेल्या वृक्षारोपणाची, अवघ्या काही दिवसांत काय अवस्था झाली आहे, याचा अत्यंत विदारक चित्र नागपुरात पाहायला मिळतंय. नागपूर महानगरपालिकेने लावलेल्या रोपांना गाई- म्हशींनी फस्त तर केलंच, पण दुर्दैवी बाब म्हणजे सुदाम नगरी परिसरात खुद्द महापालिकेने लावलेल्या रोपांवर जमीन समतल करण्याच्या नावाखाली जेसीबी चालवले आहेत. आता अधिकारी चूक झाली, पुन्हा होणार नाही असे म्हणत, या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. एक जुलै ते सात जुलै या सातच दिवसात मुनगंटीवार आर्मीने राज्यात 4 कोटींपेक्षा जास्त रोपांची लागवड करत ठरवलेलं उद्दिष्ट गाठलं आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन या मोहिमेची स्तुती केली. मात्र आज वृक्षारोपणाच्या या महामोहिमेचा अंत होत आहे. हिरव्यागार रोपांबद्दल सरकारी क्रूरतेचे अत्यंत विदारक चित्र समोर येत आहे. नागपूरच्या सुदाम नगरी भागात अंबाझरी उद्यान ते नागपूर विद्यापीठाकडे  जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला नागपूर महापालिकेने 1 जुलै रोजी वृक्षारोपण केले होते.  महापालिकेचे उपमहापौर आणि महापालिका आयुक्तांनी या ठिकाणी रोपं लावली होती. घाई- गडबडीत अधिकाऱ्यांनी काही रोपं खड्ड्यात टाकून त्यावर माती टाकण्याची तसदी ही घेतली नाही. त्यामुळे बुंध्याजवळ काळी कीड लागलेली काही रोपं अंतिम घटका मोजत आहेत. तर उर्वरित बहुतांशी रोपं गाई म्हशींनी फस्त केली आहेत. आज वृक्षारोपणाच्या खड्ड्यात फक्त रोपांचे सांगाडे म्हणजेच सुकलेले देठ शिल्लक आहे. मात्र, या वृक्षारोपणाची सर्वात दुर्दैवी आणि संतापजनक बाब म्हणजे ज्या ठिकाणी गाजावाजा करत वृक्षारोपण झाले, त्याच ठिकाणी दोन दिवसानंतर महापालिकेने जेसीबी, टिप्पर लावून जमीन समतलीकरणाचे काम हाती घेतले.  सुदामनगरी भागात असलेला जुना खड्डा बुजवण्यासाठी ते आवश्यक असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र, याच समतलीकरणाच्या कामामुळे जेसीबीखाली चिरडून अनेक रोपं नाहीशी झाली आहेत.  त्यामुळे जिथे समतलीकरणाचे काम हाती घ्यायचे होते अशा ठिकाणी महापालिकेने वृक्षारोपणाचे काम घेतलेच का असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबद्दल पालिकेचे अधिकारी चूक झाली, पुन्हा होणार नाही असे सांगून महिनाभरानंतर याच्यापेक्षा चांगले वृक्षारोपण करून दाखवू असा दावा करत आहेत. "खदानीचा खड्डा भरण्यासाठी जेसीबी लावले, मात्र, जेसीबीमुळे झाडे नष्ट झालेली नाहीत. गरज भासल्यास शिल्लक झाडे दुसरीकडे स्थलांतरित करू, पूर्ण निगा ठेऊ, आता चूक झाली  पुढे अशी चूक होणार नाही" असं  धरमपेठ झोनचे उपायुक्त महेश मोरोणे यांनी सांगितलं. नागपूर राज्याची उपराजधानी आहे.  इतर शहरांच्या तुलनेत थोडी जास्त हिरवीगारही आहे. मात्र, सरकारी उद्दिष्ट गाठण्यासाठी नागपुरात ही वारंवार वृक्षारोपणाच्या महामोहिमा हाती घेतल्या जातात. अधिकाऱ्यांना संख्यात्मक उद्दिष्ट दिलं जातं. त्यामुळेच संख्या गाठण्यासाठी चुकीच्या ठिकाणी रोपे लावून त्यांचा बळी दिला जातो. मात्र, यातून सध्या काय होतो ह्याचा विचार आता मुनगंटीवार आणि त्यांच्या सुज्ञ अधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे. नागपुरात गेल्या वर्षी केलेले वृक्षारोपणाचे वास्तवही एबीपी माझाने दाखविले होते. आता अवघ्या काही दिवसांपूर्वी झालेल्या वृक्षारोपणाचे हे विदारक वास्तव आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget