एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राहुल आग्रेकर हत्येप्रकरणातील मुख्य आरोपीची आत्महत्या
राहुल आग्रेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर पोलिसांनी पंकज हारोडे नावाच्या एका आरोपीला अटक केली होती. मात्र दुर्गेश बोकडे पळू जाण्यात यशस्वी ठरला होता.
नागपूर : नागपुरातील लॉटरी व्यापारी राहुल आग्रेकर यांच्या अपहरण आणि हत्याकांडातील मुख्य आरोपीने आत्महत्या केली आहे. दुर्गेश बोकडे असं आरोपीचं नाव असून त्याने रायपूर इथल्या गुप्ता गेस्ट हाऊसच्या खोली क्रमांक 4 मध्ये गळफास घेतला.
राहुल आग्रेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर पोलिसांनी पंकज हारोडे नावाच्या एका आरोपीला अटक केली होती. मात्र दुर्गेश बोकडे पळू जाण्यात यशस्वी ठरला होता.
काय आहे प्रकरण?
21 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजता दारोडकर चौक परिसरातून राहुल आग्रेकर यांचं अपहरण झालं होतं. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी आग्रेकर यांच्याच फोनवरुन कुटुंबियांकडून एक कोटीच्या खंडणीची मागणीही केली होती. त्याच दिवशी दुपारी राहुल यांचा जळालेला मृतदेह बुटीबोरीजवळ पेटीचुहा शिवारात आढळला होता.
नागपुरातील अपहृत लॉटरी व्यापाऱ्याची हत्या झाल्याचा संशय
राहुल आग्रेकर यांच्या अपहरण आणि हत्येमध्ये दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडे या दोघांचा हात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं. तेव्हापासूनच नागपूर पोलिस दोघांच्या शोधात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंडमध्ये शोधमोहीम राबवत होते.
मात्र, मंगळवारी आरोपी पंकजने हावडामधून महाराष्ट्रात त्याच्या एका नातेवाईकाकडे फोन करत त्यांच्याजवळचे पैसे संपले असून, त्यांना लपण्यात आता अनेक अडचणी येत असल्याची माहिती दिली होती.
नागपुरात एक कोटींच्या खंडणीसाठी लॉटरी व्यापाऱ्याचं अपहरण
पोलिसांनी आधीच आरोपींच्या सर्व नातेवाईकांचे फोन टॅप केले होते. त्यामुळे फोन कॉलची माहिती मिळताच नागपूर पोलिसांचे एक पथक विमानाने कोलकाताला रवाना झालं. शिवाय झारखंडमधूनही एक पथक कोलकात्याला रवाना झालं. अखेर काल पंकजला हावडामधील एका लॉजमधून अटक करण्यात पोलिसांना यश आलं.
अखेर दुर्गेश बोकडेने आज आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement