एक्स्प्लोर
भाजपने हट्ट पुरवला, जानकरांनी दानवेंचे पाय धरले!
महादेव जानकरांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पाय धरले. अर्ज दाखल करताना जानकरांनी रासपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा हट्ट धरला होता.

नागपूर: नागपूरमध्ये आज विधानपरिषदेच्या जागेसाठी भाजपच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्यावेळी भाजपमधून उमेदवारी भरणाऱ्या जानकरांनी यावेळी स्वत:च्या पक्षातून म्हणजेच रासपमधून अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करतेवेळी महादेव जानकरांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पाय धरले. अर्ज दाखल करताना जानकरांनी रासपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा हट्ट धरला होता. त्यांचा हट्ट भाजपने अखेर पूर्ण केल्याचं पाहायला मिळालं.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी बिनविरोध निवडणूक होणार आहे. त्याचा अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर
एकूण 11 विधानपरिषद आमदार यावेळी निवृत्त होणार असून 27 जुलै 2018 रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. 16 जुलैला या जागांसाठी निवडणूक होणार आहे. 5 जुलैला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून 9 जुलैपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल.
त्यामध्ये राष्ट्रवादीच्या चार, काँग्रेसच्या तीन, भाजपचा एक, शिवसेना, रासप आणि शेकापच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे.
या सदस्यांचा कार्यकाळ संपणार
भाजपचे भाई गिरकर, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर यांची मुदत संपत आहे.
संबंधित बातम्या
घोडेबाजार टाळणार, विधानपरिषदेच्या सर्व 11 जागा बिनविरोध होणार?
काँग्रेसतर्फे रणपिसे, वजाहत मिर्झांना विधानपरिषदेचं तिकीट
VIDEO: नागपूर : ...आणि महादेव जानकरांनी रावसाहेब दानवेंचे पाय धरले!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
