एक्स्प्लोर
...तर नागपुरात बुडालेल्या 'त्या' तरुणांचे प्राण वाचले असते?
नागपूर : संध्याकाळी साडेसहा सातची वेळ.. नागपुरातून 9 मित्र सुट्टी एन्जॉय करण्यासाठी वेणा तलावाजवळ आले. एका मच्छिमाराला पटवून परवानगी नसतानाही बोटिंगसाठी तलावात गेले आणि सुरु झाली मजामस्ती, फोटोसेशन आणि फेसबुक लाईव्ह.
फेसबुक लाईव्ह संपलं. त्यांनी चक्क आपल्या मित्रांना फेसबुकवरुन टाटा-बाय बाय केलं, आणि अवघ्या काही क्षणात बोट उलटली. नागपुरातून आलेल्या 9 जणांपैकी 8 जण बुडाले. सोबत गावातील 3 मासेमारांनाही जलसमाधी मिळाली.
लग्न तोंडावर असताना वेणा तलावात बुडून परेशची एक्झिट
नागपूरपासून वेणा तलाव 30 किलोमीटरवर आहे. हे पर्यटनस्थळ नाही. इथं बोटिंगसाठी पाण्यात उतरायला सक्त मनाई आहे. पण तलावानजीक ना तसा कुठला बोर्ड आहे, ना सुरक्षा रक्षक. 8 तरुण मुलांचा जीव गेल्यावरही प्रशासनाचं उत्तर आश्चर्यचकित करणारं आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे वेणा तलावावर आले. पण प्रशासनाच्या हलगर्जीपणाचं खापर त्यांनी तरुणांच्या फेसबुक आणि सेल्फीवर फोडलं. बोट लहान होती. 12 जणांचं वजन पेलण्याएवढी तिची क्षमताही नव्हती. त्यात मुलांची मजामस्ती आणि पावसाळी वातावरणामुळे वाऱ्याचा जोर.. पण एखादा सुरक्षा रक्षक असता तर 8 जीव वाचले असते.फेसबुक लाईव्हच्या नादात जीव गेला, नागपूरमध्ये 11 तरुण बुडाले
एकाच दिवशी 8 कुटुंबातली 8 कर्तीसवरती मुलं गेली. कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ, कुणाचा बाप तर कुणाचा पती गेला. त्यांचं दु:ख कुठल्याही शब्दात मावणार नाही. त्यामुळे कुठंही फिरायला जाताना, पिकनिकला जाताना आपल्या जवळच्या लोकांचे चेहरे आठवा.. परवानगी नसलेल्या, सुरक्षा नसलेल्या ठिकाणी जीवावर बेतणारं धाडस करु नका.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement