एक्स्प्लोर
Advertisement
भारतीय बनावटीच्या 'फाल्कन 2000' चार्डर्ट जेटचं 2021 मध्ये उड्डाण
डसॉल्ट आणि रिलायन्स यांची संयुक्त कंपनी डीआरएएलमध्ये या जेटची निर्मिती करण्यात आली आहे. फ्रान्स आणि भारतीय तंत्रज्ञ नागपूरच्या मिहान सेझमध्ये जानेवारी 2018 पासून काम करत होते.
नागपूर : भारताच्या शिरपेचात लवकरच आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीचं स्वयंनिर्मित पहिलं चार्टर्ड जेट "फाल्कन 2000' हे 2021 मध्ये उड्डाण करणार आहे. या जेटची निर्मिती नागपूरच्या एसईझेडमधील अनिल धीरुभाई एरोस्पेस पार्कमध्ये करण्यात आली आहे. नुकतंच या विमानाच्या कॉकपीटचं काम पूर्ण झालं आहे.
डसॉल्ट आणि रिलायन्स यांची संयुक्त कंपनी डीआरएएलमध्ये या जेटची निर्मिती करण्यात आली आहे. फ्रान्स आणि भारतीय तंत्रज्ञ नागपूरच्या मिहान सेझमध्ये जानेवारी 2018 पासून काम करत होते. फाल्कन 2000 हे चार्टर्ड जेट 2012 मध्ये उड्डाण करेल, अशी माहिती मिहान एसईझेडच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी यांनी दिली आहे.
"पहिल्या टप्प्यात कंपनीने 10 ते 18 आसनी 'फाल्कन 2000' या चार्टर्ड जेट विमानाच्या कॉकपीटचं काम पूर्ण केलं. लवकरच पुढील काम सुरु केलं जाणार असून 2021 मध्ये डीआरएएल कंपनी पूर्णपणे नागपुरात निर्मिती झालेलं छोटं चार्टर्ड जेट उड्डाण करेल," असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसं झाल्यास जागतिक पातळीवर एव्हिएशन क्षेत्रात नागपूरचे लौकिक निर्माण होईल.
फाल्कन 2000 जेटचं वैशिष्ट्ये
2 क्रू मेंबर आणि 10-18 प्रवासी क्षमता असलेलं चार्टर्ड जेट
850 किमी प्रति तास वेगाने उड्डाण करणारं हे जेट 39 हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करु शकतं
1990 च्या दशकापासून फ्रान्सच्या डसॉल्ट कंपनीच्या या जेटची जगभरात बिझनेस जेट म्हणूनही ओळख
मोठे उद्योजक, श्रीमंत चित्रपट, अभिनेते किंवा खेळाडू, चार्टर्ड विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून या जेटचा वापर
तटरक्ष दलाकडूनही फाल्कन जेटचा वापर
30 ते 35 मिलियन डॉलर्स किंमत असलेलं हे जेट स्टेटस सिम्बॉल म्हणूनही ओळखलं जातं.
फ्रान्स, दक्षिण कोरिया, जपान, बुल्गारियासह जगातील अनेक देशात विविध सेवेसाठी या जेटचा वापर
डीआरएल कंपनीला पुढील टप्प्यात राफेल या लढाऊ विमानाचे सुटे भाग नागपुरात उत्पादित करण्याचं कंत्राट मिळालं आहे. सध्या भारतीय राजकारणात राफेल करारावरुन रणकंदन माजलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement