एक्स्प्लोर
लग्नसोहळ्यातून वधूची पर्स चोरी, व्हिडिओ शूटिंगमुळे तरुणीला बेड्या
नागपूर : नागपुरात लग्न समारंभातून नवरीची पर्स चोरणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुणी स्टेजवरुन वधूची पर्स चोरत असतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
8 जुलै रोजी नागपुरातील मानकापूर भागात राठोड लॉन्सवर मंगेश जामुळकर यांचा लग्न सोहळा पार पडला. नवरदेव-नवरी वडिलधाऱ्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी स्टेजच्या खाली उतरले. त्याचवेळी 18 ते 20 वर्षांची एक तरुणी दबक्या पावलांनी स्टेजवर चढली.
कोणांच लक्ष नसल्याची संधी साधून तिनं गुपचूप नवरीची पर्स उचलली आणि ती पसार झाली. तिची चोरी नकळतपणे व्हिडीओ शुटिंगमध्ये कैद झाली आणि ही चोरी उघड झाली. व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी संबंधित चोरटीला अटक केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement