एक्स्प्लोर
अरुण गवळीच्या फोटोसह प्रजासत्ताक दिनी नागपुरात हुल्लडबाजी
नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात उत्साह असतानाच नागपुरातल्या काही तरुणांनी देशभक्तीच्या नावानं गोंधळ घातला. या तरुणांनी प्रजासत्ताक दिनाच्या मिरवणुकीत चक्क कुख्यात गुंड अरुण गवळीचा बॅनर लावला.
नागपूरच्या तिलकनगर, धरमपेठ भागातल्या या तरुणांनी डीजेच्या कर्कश आवाजात हिडीस नृत्य करत मिरवणूक काढली. वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवत त्यांनी गाड्याच्या टपावर, बोनेटवर बसून ओंगळवाणं प्रदर्शन केलं.
हातात तिरंगा घेत गुंडांच्या समर्थनार्थ फिल्मी गाण्यांवर नाचणाऱ्यांच्या देशप्रेमाबाबत प्रश्चचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळं आता पोलीस कुख्यात गुंडाचं समर्थन करुन सर्वसामान्यांना डोकेदुखी देणाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे नागपूरवासियांचं लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement