धक्कादायक! नागपुरात 12 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, जीवे मारण्याची धमकी, दोन आरोपींना अटक
नागपुरात 12 वर्षाच्या सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
Nagpur Crime News : नागपुरात 12 वर्षाच्या सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिला नागपूर जवळच्या भिलगाव परिसरातील लॅाजवर नेऊन दोन आरोपींनी अत्याचार केला आहे. आरोपींनी अत्याचार करतानाचे व्हिडीओ काढले आहेत. कुणाला सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल करणार असे सांगून जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांकडून दोन आरोपींना अटक, दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
पोलिसांनी करण आणि रोहीत या दोन आरोपींना अटक केली आहे. दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून दोघांवर यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना गुरुवारी घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी पीडीतेच्या आई वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलीसांनी आरोपी विरुद्ध बलात्कार आणि पोस्कोच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
























