एक्स्प्लोर

...तर नागपूर मेट्रोच्या तिकिटावर 10 टक्के सवलत; आतापर्यंत सुमारे 31 हजारांवर प्रवाशांनी घेतला लाभ

या कार्डच्या माध्यमाने मेट्रोने प्रवास केल्यास प्रवाश्यांना तिकीट दरावर 10 % सुट देखील मिळते. आतापर्यंत 31 हजारांवर प्रवाशांनी याचा लाभ घेतला असून दिवसेंदिवस लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे.

Nagpur News : नागपूर मेट्रोच्या (Nagpur Metro) प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून महा मेट्रोच्या तिकीट दरात थेट दहा टक्के सवलतीचा पर्याय प्रवासांसाठी उपलब्ध आहे. यासाठी नागपूर मेट्रोने महा कार्डचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. महत्वाचे म्हणजे कार्डच्या माध्यमाने मेट्रोने प्रवास केल्यास प्रवाशांना तिकीट दरावर 10 % सूट देखील मिळते. महा कार्ड मेट्रो स्थानकांवर खरेदी करता येते. आतापर्यंत 31 हजारांवर प्रवाशांनी याचा लाभ घेतला असून दिवसेंदिवस लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे.

महा मेट्रोने नेहमीच तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा (Digital Payment Mode) वापर करण्यास प्रोत्साहन दिले असून याकरता मोबाइल ऍप आणि महा कार्ड सह अनेक पर्याय प्रवाश्यांना उपलब्ध करून दिले आहेत. याच प्रयत्नांची पावती म्हणजे नागपूरकरांनी महा कार्डची मोठ्या प्रमाणात केलेली खरेदी. साहजिकच मेट्रोने प्रवास करताना डिजिटल पेमेंट देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.आतापर्यंत एकूण 31 हजार 886  महा कार्डांची विक्री झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) सहकार्याने या कार्डचे संचालन करण्यात येत आहे. 

सरासरी दर महिन्याला 1800 महा कार्डांची विक्री होते,प्रवाश्यांचा प्रवास सुखकर व्हावा याकरता महा मेट्रोने EMV (युरो मास्टर व्हिसा) स्मार्ट कार्ड आधारित ओपन लूप ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) प्रणाली स्वीकारली आहे आणि ही नागपुरातील सर्व मेट्रो स्थानकांवर लागू करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यामातून प्रवाश्यांना मेट्रोमध्ये चढताना आणि उतरताना मेट्रो स्टेशनवरील ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) गेट्सवर फक्त त्यांचे कार्ड टॅप करावे लागते आणि त्या माध्यमाने प्रवासी भाडे कार्डमधून कापल्या जाते. महा कार्ड आणि अत्याधुनिक एएफसी प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक असून जेवढा प्रवास केला असेल तेवढेच भाडे कार्ड मधून वजा केल्या जाते तसेच याप्रकारे कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही. ईएमव्ही मानक आधारित स्मार्ट कार्ड ओरिएंटेड ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टीम (AFC) हे प्रवास भाडे भरण्यासाठी उत्तम उपाय आहे.

महा कार्ड आणि एएफसी प्रणालीमुळे मेट्रोने प्रवास करणे सोपे आणि स्वस्त तर झाले आहेच पण या सोबतच कार्डचा वापार केल्याने तिकीट घेण्याची गरज नसल्याने मेट्रो ट्रेन राईड सुखकर देखील केली आहे.

महाकार्डची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे

•मेट्रो स्थानकांवर महा कार्डची खरेदी तसेच टॉपअप पर्याय उपलब्ध आहे.
•अत्यंत सुरक्षित चिप आधारित ड्युअल इंटरफेस (संपर्क आणि संपर्करहित) स्मार्ट कार्ड.
•स्वाईप करण्याच्या पद्धतीचा अवलंब
•इंटरनेट आणि मोबाइल आधारित व्यवहारांसाठी सुसंगत
•(Europay, Master, Visa, Rupay) प्लॅटफॉर्मवर स्वीकृत वैयक्तिक कार्ड.

ही बातमी देखील वाचा

Indian Science Congress : नागपुरात 49 वर्षांनंतर प्रथमच 'इंडियन सायन्स काँग्रेस'; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Embed widget