एक्स्प्लोर

विद्यार्थ्यांऐवजी वटवाघळं, नागपूरमधील कॉलेजला भूतबंगल्याची अवकळा

‘सुविधा नसल्यानं विद्यार्थी येत नाहीत. पहिल्या वर्षी किमान 130 विद्यार्थी लागतात. पण संस्थाचालक विद्यार्थ्यांना सांगतात की तुम्ही येऊ नका. तुमची नावे द्या. आम्ही हजेरी लावतो.’

नागपूर : महाविद्यालय म्हणजे  मुलं, प्राध्यापक, सुसज्ज असे वर्ग आले. पण नागपूरमध्ये एक असं कॉलेज आहे. जे गेल्या 18 वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी नाही तर वटवाघळांसाठी सुरु आहे. असं म्हणण्याचं नक्की कारणही तसंच आहे. कोट्यवधींचं अनुदान, लाखो रुपये पगार.. पण एकही विद्यार्थी नसणारं चक्रपाणी महाविद्यालय गेल्या 17 वर्षांपासून नागपूरच्या हुडकेश्वर भागात असंच उभं आहे. कारण या इमारतीत घुसताच याला वटवाघळांचं कॉलेज का म्हणतात याची प्रचिती येते. ज्या इमारतीत माणसंच येत नाहीत ती इमारत वटवाघळांसाठी परफेक्ट आसरा आहे. कुणीही न बसल्यानं धुळीचे थर साचलेले बाक, 15 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणादिनानिमित्त बोर्डावर शेवटचं केलेलं लिखाण. यावरुन इथं विद्यार्थी येत नाहीत हे निश्चित आहे. खरं तर यंदा या कॉलेजमध्ये म्हणे 87 विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला आहे. पण मग विद्यार्थी गेले कुठे? असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही या उद्ध्वस्त महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच गाठलं. ‘सुविधा नसल्यानं विद्यार्थी येत नाहीत. पहिल्या वर्षी किमान 130 विद्यार्थी लागतात. पण संस्थाचालक विद्यार्थ्यांना सांगतात की तुम्ही येऊ नका. तुमची नावे द्या. आम्ही हजेरी लावतो.’ अशी माहिती यावेळी प्राचार्यांनी दिली. बरं... कॉलेजचा आम्ही थोडा आणखी फेरफटका मारला. तेव्हा कॉलेजची दयनीय अवस्था समोर आली. प्रशासकीय कार्यालयाच्या नावाखाली दोन टेबलं आणि दोन खुर्च्या. त्यावर दोन कर्मचारी. अख्ख्या कॉलेजमध्ये एक कॉम्प्युटर, एक प्रिंटर आणि एक स्कॅनर. तेही धूळ खात पडलेलं. मास्तरांना पाणी पिण्यासाठी धुळीनं माखलेलं प्युरिफायर.. त्यातून काय शुद्ध होतं देव जाणे. हे असलं कॉलेज चालवायला नागपूर विद्यापीठ तब्बल 1 कोटी 33 लाखांचं अनुदान दर वर्षी देतं. मग आता प्रश्न असा की हे पैसे जातात तरी कुठे? प्राध्यापक आणि संस्थाचालकांमधला हा वाद विद्यापीठाला दिसत नाही का? महाविद्यालयाची दुर्दशा विद्यापीठाला दिसत नाही का? विद्यापीठाच्या तपास समितीने शून्य गुण दिले होते. मग त्यानंतरही रिपोर्ट कसा बदलून आला? आणि जे आमच्या एबीपी माझाला दिसते. ते त्या समितीच्या डोळ्यांना दिसत नाही का? असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अनुदानाच्या नावाखाली उधळपट्टी कशी होते. याचं फक्त हे एक उदाहरण आहे. महाराष्ट्रात अशी किती महाविद्यालये असतील याची तर गणतीच नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Suman Kalyanpur : भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
Monsoon Updates : मोठी बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; हवामान खात्याने आता पावसाची नवी तारीख सांगितली
मोठी बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; हवामान खात्याने आता पावसाची नवी तारीख सांगितली

व्हिडीओ

Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Embed widget