एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आमदार निवासातील बलात्कार पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न
नागपूर : नागपूरमधील आमदार निवासातील सामूहिक बलात्कार पीडित मुलीने शुक्रवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनी ही माहिती दिली.
पीडित मुलीला प्रचंड नैराश्य आलं आहे. शिवाय आरोपीच्या ओळखीच्या लोकांनी पीडित मुलीच्या कुटुंबावर दबाव आणून प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचं कळतं.
दरम्यान, आमदार निवासात महिला सुरक्षितता वाढवण्याची गरज आहे. तिथे अनेक उणिवा आहेत. नागपुर पोलिस या प्रकरणात संवेदनशील वाटत नाहीत. अशा प्रकरणाबद्दल प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचं नीता ठाकरे म्हणाल्या.
काय आहे नेमकं प्रकरण?
मनोज भगतच्या दुकानात काम करणाऱ्या 17 वर्षीय मुलीवर रजतची नजर होती. मनोज भगतनं पीडितेच्या घरी खोटं कारण सांगितलं. मुलीला कुटुंबासह भोपाळला घेऊन जातो अशी फूस लावली आणि आमदार निवास बूक केलं.
मनोज भगत याने रजतसाठी सर्व व्यवस्था केली होती. पण एकट्या मुलीला पाहून मनोजची नियत फिरली आणि दोघांनी मिळून पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार केला.
14 एप्रिल ते 17 एप्रिल चार दिवस आमदार निवासात मुलीवर बलात्कार होत होता. या काळात मुलीची तब्येत बिघडली. तिला फिगो कार (एमएच 31 ईके 5408) ने हॉस्पिटलमध्ये नेऊन पुन्हा आमदार निवासात आणलं. पण इथल्या व्यवस्थापनाला त्याची पुसटशी कल्पनाही नव्हती.
नागपूरमधील धक्कादायक प्रकारानंतर आमदारांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
आमदार निवासासाठी तीन नवे नियम :
- रुम देताना ओळखपत्राची प्रत सक्तीने घेतली जाईल. (आधीही हा नियम होता. पण, संबंधित प्रकरणात ओळखपत्राची प्रत घेतली नव्हती.)
- शाखा अभियंता दररोज नोंदवहीमधील रुम आरक्षणाची नावे आणि तेच लोक प्रत्यक्ष रुममध्ये राहतात का? का याची पाहणी करेल.
- उपविभागीय अभियंता आता आठवडयातून दोनदा रूम आरक्षण नोंदवही आणि प्रत्यक्ष रुम पाहणी करेल.
संबंधित बातम्या
नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
नागपूरच्या आमदार निवासातील गँगरेपबाबत धक्कादायक माहिती
नागपूर आमदार निवासाचे नियम कडक, ‘माझा’च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement