एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अपहरण, लुटीचा आरोप; नागपुरात तीन ग्रामीण पोलिसांचं निलंबन
नागपूर : नागपूरमध्ये तीन ग्रामीण पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. अपहरण आणि लूट अशा गंभीर आरोपाखाली तीन पोलिस शिपायांवर कारवाई करण्यात आली.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ही कारवाई केली. शशी शेंडे, मंगेश डांगे, अमोल नागरे अशी निलंबित पोलिसांची नावं आहेत.
8 मार्च रोजी खापा परिसरात एका कारमध्ये 28 लाखांचे जुने चलन (1000 आणि 500 च्या नोटा) घेऊन जाताना दोघे आढळले होते.
मात्र, हे तीन पोलिस त्यांना निर्जन ठिकाणी घेऊन गेले आणि 14 लाख रुपये लूटले होते. तसंच नोटा घेऊन जाणाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता सोडून दिले होते.
ही बाब वरिष्ठाच्या लक्षात आल्यानंतर चौकशी झाली. त्यात तिन्ही पोलिस कर्मचारी दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
तसंच तिन्ही दोषी पोलिसांविरोधात अपहरण आणि लुटीचा गुन्हा ही नोंदवला आहे.
महत्त्वाचं म्हणजे 7 मार्च रोजी नागपूर पोलिस दलातील सात पोलिसांना अवैध धंद्याना आश्रय देण्याच्या आरोपात निलंबित करण्यात आलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement