एक्स्प्लोर

MVA Seat Sharing : घराणेशाहीवर वंचितने ठेवलं बोट! विदर्भातील जागावाटपाबाबत वंचितचा आक्रमक पवित्रा; नेमके प्रकरण काय?

मविआच्या घटक पक्षातील प्रस्थापित नेत्यांनी आपल्या मुला-मुलींना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी वंचितने केलीय. वंचित आणि मविआमध्ये वाटाघाटी सुरू असताना वंचितने घराणेशाहीच्या मुद्द्यावरून थेट  इशारा दिलाय.

MVA Seat Sharing Lok Sabha 2024: महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील प्रस्थापित नेत्यांनी आपल्या मुला-मुलींना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी वंचितने (Vanchit) केली आहे. विशेष म्हणजे वंचित आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपाबाबत वाटाघाटी सुरू असताना वंचितने घराणेशाहीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला थेट इशारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित मध्ये नवा तिढा निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेषतः विदर्भातील (Vidarbha) जागेवरून वंचित आक्रमक होताना दिसत आहे. काँग्रेस (Congress) अथवा इतर घटक पक्षांनी प्रस्थापित घराण्यांना वगळून इतर वंचित समूहाला कुठेतरी संधी दिली पाहिजे, अशी मागणी वंचितच्या वतीने करण्यात आली आहे. 

घराणेशाहीवर वंचितने ठेवलं बोट! 

विदर्भातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील जी प्रस्थापित घराणी आहे, ज्यामध्ये मग ती मुत्तेमवारांचे घराणं असेल, वडट्टीवारांचे घराणं असेल, आत्रामांचे घराणं असेल किंवा मग ते देशमुख यांचे किंवा मग धानोरकरांचं घराणं असेल. गेली कित्येक वर्षांपासून वारंवार याच घराण्यातील नावे समोर आलेली आहेत.

त्यामुळे आता काँग्रेस आणि महाविकास आघाडीने आत्तापर्यंत ज्या घराण्यांना पोसलय याला कुठेतरी वागळून इतर वंचित समूहाला संधी दिली पाहिजे. अशी मागणी विदर्भातील वंचितच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता वंचित आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षात घराणेशाहीवरुन पुन्हा कुठला नवा वाद निर्माण होतो का, की यावर काही तोडगा निघतो,  हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

संजय राऊत खोटं बोलतात 

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आज थेट महविकास आघाडीला इशारा देत संजय राऊत खोटं बोलत असल्याचा आरोप केलाय. प्रकाश आंबेडकर आज अमरावती येथे आले असता ते बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही, असं खासदार संजय राऊत म्हणतात. मात्र ते खोटं बोलतात. महाविकास आघाडीमध्ये आपापसात मतभेद असल्यानेच जागावाटप रखडले असल्याचे ते म्हणाले.

त्यामुळे त्यानी पहिले मतभेद मिटवावेत, आपल्याला मोदींना हरवण्यासाठी लढायचं आहे. त्यामुळे काँग्रेसने देखील त्यांचा इगो बाजूला ठेवावा असंही ते म्हणाले आहे. अशातच आता विदर्भातील जागावाटपाबाबत वंचितने आक्रमक पवित्रा घेत घराणेशाहीवर बोट ठेवलं असल्याने महाविकास आघाडीत नवा वादंग उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

रखडलेल्या जागावाटपाला वंचित जबाबदार नाही

महविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा रखडली असून त्यासाठी वंचित जबाबदार नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. ते म्हणाले की, मविआमध्ये 10 जागेवरून मतभेद सुरू आहेत. पाच जागा अशा आहेत त्यावर तिन्ही पक्षात शेअरिंग होत नाही. पाचही जण जागा मागत आहेत. महाविकास आघाडीमधील भांडण जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत जागावाटप होणार नाही, संजय राऊत माध्यमांसमोर खोटं बोलतात असं सांगत आधी तुमच्यातील भांडण मिटवा असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस प्रभारी रमेश यांना मी पत्र लिहिलं आहे. सगळी हकीकत मी लिहलं आहे. आम्ही समजोता करायला तयार आहे. पण त्यांच्याकडून अजून उत्तर आलेलं नाही. महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवावी अशी अपेक्षा आम्ही करत असल्याचे देखील आंबेडकर म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget