एक्स्प्लोर

‘जय श्रीराम’चा नारा देण्यासाठी तरुणाला धमकावलं, ताब्यात घेतलेल्या तरुणांचा इन्कार

सिडको पोलीस ठाण्यात धमकावणाऱ्या अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात पुन्हा एकदा जय श्रीरामच्या नाऱ्यावरुन एका मुस्लिम व्यक्तीला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील आझाद चौकात रात्री अज्ञातांनी जय श्रीराम म्हणायला लावत झोमॅटो कामगाराला धमकावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी सिडको पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या या चार जणांनी घडलेल्या प्रकरणाचे खंडण केलं आहे. तसेचं श्रीराम म्हणायला लावण्यावरुन काहीही झालं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. गाडी ओहरटेक करण्यावरुन बाचाबाची झाल्याचं माहिती ताब्यात घेतलेल्या चार जणांनी दिली आहे. रात्री साडे बारा ते एकच्या दरम्यान दहा ते बारा अज्ञातांनी मुस्लिम झोमॅटो कामगाराला जय श्रीरामचा नारा द्यायला लावत धमकावलं. या घटनेनंतर काही काळ औरंगाबादच्या आझाद चौकात तणावाचे वातावरण होते. मात्र रात्री पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थीती नियंत्रणात आणली. जमावाने या प्रकरणी धमकावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सिडको पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पण अखेर जय श्रीरामचा नाऱ्य़ावरुन काहीही घडलेलं नसून हा सर्व प्रकार गाडी ओहरटेक करण्यावरुन झालेल्या बाचाबाचीत हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार जणांनी सांगितले आहे. 'जय श्रीराम' म्हणण्यासाठी मुस्लीम तरुणाला मारहाण एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारा इम्रान पटेल हा तरुण कामावरून रात्री घरी परतत असताना हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगर येथे आठ ते दहा तरुणांनी त्याला अडवलं. त्यापैकी एकाने इम्रानच्या मोटारसायकलची चावी काढून घेतली आणि कुठे राहतो असं विचारलं. त्यानंतर टोळक्याने शिवीगाळ करुन जय श्रीराम बोलण्यास जबरदस्ती केली. इम्रानने जय श्रीराम न म्हटल्याने त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या इम्रानने त्यांच्यासमोर जय श्रीराम म्हटलं. मात्र त्यानंतरही टोळक्याने त्याला मारहाण केली. दरम्यान आरडाओरडा ऐकून जवळील गणेश नावाचा व्यक्ती आणि त्याची पत्नी घरातून बाहेर आले. त्यांनी टोळक्याच्या तावडीतून इम्रानची सुटका केली. घटनेनंतर घाबरलेल्या इम्रानने आज बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : सीसीटीव्हीत दिसणारा आणि अटकेतल्या व्यक्तीत साम्य नाही,आरोपीच्या वकिलाचा दावाST Bus Hike : सर्वसामान्यांना झटका!एसटीचा प्रवास महागला, रिक्षा आणि टॅक्सीचीही भाडेवाढMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 25 Jan 2025 : ABP MajhaSanjay Raut Mumbai : महाराष्ट्रात ३ उपमुख्यमंत्री होणार, शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत उद्या नसतील - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Embed widget