एक्स्प्लोर

प्रेयसीची छेड काढली म्हणून मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या, चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

टीव्ही वाहिन्यांवरील गुन्हे विषयक मालिका बघून या खुनाचा कट रचण्यात आला. आपल्या प्रेयसीची छेड काढली म्हणून सख्ख्या भावाचा काटा काढण्याचे अंकितने ठरवले.

चंद्रपूर : टीव्हीवरील क्राईम शो बघून मोठ्या भावाने आपल्या 17 वर्षीय लहान भावाची हत्या केल्याचा धक्कादायक घटना चंद्रपूर शहराजवळच्या दुर्गापूर परिसरात घडली आहे. हत्येनंतर मृतदेह पुरल्याचंही समोर आलं आहे. आरोपी अंकित रामटेके याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भावाने प्रेयसीची छेड काढली या रागातून अंकितने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दुर्गापूरच्या वेताळ चौक भागात उघडकीस आलेली रामटेके कुटुंबातील दोन सख्ख्या भावांची दुर्दैवी कहाणी फिल्मी स्टाईल हत्येचा नमुना ठरली आहे. काल संध्याकाळी सत्यवान रामटेके यांच्या पडक्या घरात दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्याला दिली. जमिनीतून एक मानवी हात बाहेर आला असल्याची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या भागात 10 ते 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अनिकेत रामटेके या 17 वर्षीय मुलाचा हा मृतदेह असून त्यांची हत्या झाल्याचं काही वेळात निष्पन्न झाले. पोलिसांनी या हत्येमागे कोण असावे याचा शोध सुरु केला त्यावेळी रामटेके यांच्या घरातील 21 वर्षीय मोठा मुलगा अंकित बेपत्ता असल्याचे उघड झाले. एकीकडे अनिकेत बेपत्ता असल्याची पोलिसात असलेली तक्रार आणि दुसरीकडे पुरलेला मृतदेह सापडताच बेपत्ता झालेला सख्खा मोठा भाऊ यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी तातडीने खबऱ्यांना अॅक्टिव्ह केलं. त्यानंतर एका शेतात लपून बसलेल्या अंकित रामटेके याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या कबुली जबाबात आपणच आपल्या सख्ख्या लहान भावाचा खून केल्याची माहिती दिली. टीव्ही वाहिन्यांवरील गुन्हे विषयक मालिका बघून या खुनाचा कट रचण्यात आला. आपल्या प्रेयसीची छेड काढली म्हणून सख्ख्या भावाचा काटा काढण्याचे अंकितने ठरवले. त्यानुसार सत्यवान रामटेके यांच्या पडक्या घरात आरोपीने सख्ख्या भावाला दारू पाजली आणि त्याचा गळा आवळून खून करत प्रेत पुरले. प्रेत लवकर कुजावे यासाठी युरिया आणि इतर साहित्य देखील या खड्ड्यात टाकण्यात आले होते. एवढेच नव्हे तर आरोपी अंकीत याने एक कुत्रा मारून तोही याच घटनास्थळी फेकला. ज्यामुळे दुर्गंधी विषयी लोकांची दिशाभूल झाली.

मात्र मुसळधार पावसाने माती वाहून गेली आणि 15 दिवसांनी हा बनाव उजेडात आला. पोलिसांना घटनास्थळी शव कुजण्यासाठी आवश्यक साहित्यासह डांबर गोळ्याही आढळून आल्या. हा खड्डा मृतक आणि आरोपी यांनी मिळून अवैध दारू विक्रीसाठीच्या बाटल्या लपवण्यासाठी खोदून तयार केला असल्याचाही खुलासा आरोपीने केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून 24 तासात या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. सतत टीव्ही वरील क्राईम शो बघून आपल्या सख्ख्या भावाची हत्या करण्याचे हे प्रकरण धक्कादायक ठरले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget