सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर मुंबई ते सिंधुदुर्ग विमान तब्बल 5 तास 20 मिनिटे उशिराने
सिंधुदुर्ग विमानतळ : आज मुंबई वरून सिंधुदुर्ग मध्ये येणार विमान नियोजित वेळेपेक्षा तब्बल 5 तास 20 मिनिटांनी उशिरा आल्याने प्रवाशांना याचा फटका बसला आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग (Sindhudurg)जिल्ह्यामधील बहुचर्चित चिपी विमानतळ 9 ऑक्टोबर पासून नियमित सुरू झालं आहे. 70 आसनी विमानाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या विमानतळामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल अस बोललं जातं आहे. मात्र आज मुंबई वरून सिंधुदुर्ग मध्ये येणार विमान नियोजित वेळेपेक्षा तब्बल 5 तास 20 मिनिटांनी उशिरा आल्याने प्रवाशांना याचा फटका बसला आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास एका तासावर आला मात्र अशा पध्दतीने नियोजित वेळेपेक्षा जास्त 6 ते 7 तास वेळ लागळ्याने प्रवासी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
मुंबई ते सिंधुदुर्ग रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास 8 तास लागतात. हाच प्रवास विमानाने एक ते दीड तासावर आला आहे. सिंधुदुर्ग ते मुंबई विमान सेवा सुरू झाल्याने सिंधुदुर्ग ते मुंबई प्रवास तासावर आला आहे. मात्र आज हाच प्रवास 7 ते 8 तासांवर गेला. विमानाने प्रवास करण्यासाठी दोन तास आधी विमानतळावर पोचावं लागत. त्यात विमान 5 तास 20 मिनिटे उशीरा त्यामुळे हाच प्रवास 7 ते 8 तासांवर गेल्याने विमानाने मुंबईला जाणारे प्रवासी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. रेल्वेने प्रवास केला असता तर सात ते आठ तासांमध्ये मुंबईत पोहोचलो असतो. मात्र सिंधुदुर्ग विमानतळावर सात तास विमानाची प्रतीक्षा करावी लागली. विमान सुरू झाल्यापासून हाउसफुल चालणारे विमान अशा हलगर्जीपणामुळे उशिरा पोहोचते आहे.
आठ दिवसांपूर्वीही मुंबई विमानतळावरील तांत्रिक अडचणींमुळे नियोजित विमानाची वेळ बदलण्यात आली होती. मात्र त्यावेळी प्रवाशांना दहा तास आधी सूचना देण्यात आल्या होत्या. दुपारी एक वाजता दाखल होणारे विमान आठ दिवसापूर्वी सकाळी आठ वाजता दाखल झाले होते. मात्र यावेळी अशा कोणत्याही प्रकारच्या सूचना दिल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळे प्रवासी संतप्त झाल्याचं चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर पहायला मिळालं आहे.
मुंबई वरून येणाऱ्या विमान प्रवाशांना नेण्यासाठी येणाऱ्या कुडाळ व मालवण एसटी आगारातून एसटी बस विमानतळावर वेळेत सकाळी 11.30 वाजता दाखल झाल्या होत्या. मात्र अचानक विमान येण्याच्या वेळेत बदल झाल्याने दोन्ही बस गाड्या प्रवाश्यांची प्रतिक्षा न करताच आपल्या वेळे नुसार 1.40 वाजता मार्गस्थ झाल्या. या विमानतळावरुन मुंबई ला जाणारे प्रवासी नियमित वेळेत जेवणासाठी मुंबईत पोचतात. मात्र अचानक विमानाच्या वेळेत बदल झाल्यावर त्या प्रचंड त्रास सहन करावा लागला. सिंधुदुर्ग विमानतळावर कॅन्टीन उपलब्ध नसल्याने प्रवाशांवर उपासमारीची वेळ आली.
सिंधुदुर्ग विमानतळावर नेहमी नियोजित वेळेनुसार दुपारी 1 वाजता विमान सिंधुदुर्ग विमानतळावर येतं. मात्र आज हे विमान 5 वाजून 20 मिनिटांनी सिंधुदुर्ग विमानतळावर दाखल झाल. विमान तब्बल 5 तास 20 मिनिटं उशिराने आलं. मात्र याबाबत प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या सूचना नव्हत्या त्यामुळे या प्रवाशांना उशिराने आलेल्या विमानांचा फटका बसला.