सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई आपण सोडणार नाही, पडळकरांसह भाजप नेत्यांचा निर्धार
गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि नंतर आझाद मैदानात आणलं होतं. सदाभाऊ खोत यांना वाशी टोलनाक्यावर रोखले होतं.
ST Workers Strike : जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. एसटी कामगारांना शासकीय सेवेत घ्यावं अशी मागणी करत आज मंत्रालयावर मोर्चासाठी निघालेल्या भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि नंतर आझाद मैदानात आणलं होतं. सदाभाऊ खोत यांना वाशी टोलनाक्यावर रोखलं होतं. तर पडळकर आणि सोमय्या आमदार निवासातून मंत्रालयाकडे निघाल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखलं आणि ताब्यात घेऊन आझाद मैदानाकडे घेऊन गेले. मंत्रालयात आंदोलनाची परवानगी नसल्यानं आझाद मैदानात आंदोलन करावं अशी सूचना पोलिसांनी केली.
आझाद मैदानावर गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं,'जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई आपण सोडणार नाही.' पडळकर म्हणाले, '35 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या अश्रू पुसण्याची गरज होती त्यांच्याकडे बघण्याचा गरज होती. हे मंत्री अनिल परब अवमान याचिका दाखल करायला निघाले आहेत त्यांच्या वर कारवाई करत आहेत. कर्मचारी मुंबईत येऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न केले पण तरी तुम्ही आलात. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई आपण सोडणार नाहीत. ते म्हणताय भाजप नेते माथी भडकवताय. जिथे गरीब जनतेवर अन्याय होईल तिथे विरोधी पक्ष त्यांच्या पाठीशी राहील. दिवाळीला काय दिलं ? दीड हजारात तेलाचा डब्बा येतो का? आज आम्ही शांत बसतोय नाहीतर उद्या मंत्र्यालायच्या दिशेने जाऊ. एसटी कर्मचाऱ्यांनी येथे या ! संसार थाटू सगळ्यांना तुम्ही बोलावून घ्या. येथे आपण सगळे बसू'.
या वेळी किरीट सोमय्या म्हणाले, 'गोपीचंद पडळकर यांचं कौतुक. जण नेता हे कोणाला म्हणतात हे शरद पवार यांनी एकदा पहावं. आम्ही ठरवलं तर मंत्रालयाचा ताबा सुद्धा घेता आला असता. मंत्रालयात ते उपस्थित नाही आणि येथे ते येणार नाही. ट्रान्सफर च्या ऑर्डर वर सह्या करत होतात का, असा प्रश्न मी परब यांना येथे आल्यावर विचरेल. मी RTO च्या ट्रान्सफर बघितलं आहेत. गोपीचंद राव तुम्ही भ्रमात आहेत. एक अनिल आतमध्ये आहे. पण त्या अनिलंच काम या अनिलला करावं लागतंय.100 कोटी वसुली तर करून द्यावी लागणार ना?'
सदाभाऊ खोत म्हणाले, 'या सरकारने त्रास द्ययाच काम केले आहे तरी सरकारच्या छाताडावर बसून हे वाघ आज येथे आले आहेत. वाशी टोल नाक्यांवर आम्हला अडवलं. पण तरीही आम्ही आझाद मैदानावर आलो. 4 महिन्याचा वेळ द्या म्हणताय सरकार.अरे 4 महिन्यात काय भारत पाकिस्तान सीमा रेषा चा प्रश्न आहे का.हा परिवहन मंत्री नही क्रूरकर्मा आहे.अभी नही तो अभी नही.मला बघायचं आहे की यांच्यात दम किती आहे. न्याय मिळाल्याशिवाय आता शांत बसायचं नाही. तुम्ही स्वयंस्फूर्तीने उभा केलेला लढा आहे. जोपर्यंत तुम्ही येथे असाल तोपर्यंत मी आणि आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. '
ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
प्रवीण दरेकर म्हणाले, 'किरीट भाई तुमच्यामुळे अनिल परब पळायला नको कारण तुमच्या मुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांची पळापळ होते. जेव्हा एखादा कामगार आंदोलन हातात घेतो तेंव्हा त्याला कोणाचा बाप अडवू शकत नाही. जेव्हा एखादा कामगार आंदोलन हातात घेतो तेंव्हा त्याला कोणाचा बाप अडवू शकत नाही. संकटाच्या काळात काम करायला एसटी कर्मचरी लागतो आणि विलीनिकारनाचा विषय आला की अवमान याचिका दाखल करायची. अनिल परब यांनी शब्द दिला होता कारवाई करू नका. संघटनांना विनंती आहे की तुमच्याकडे मोर्चा वळवायला लावू नका.संघटनांना विनंती आहे की तुमच्याकडे मोर्चा वळवायला लावू नका.सगळ्यांनी एकत्र येऊन येथे लढा देऊ. नाहीतर युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या घरात जावं लागेल. परब तुम्हला हार तुरे घालू मुख्यमंत्र्यांचे पाय धरू पण तुम्ही यांना न्याय द्या'