एक्स्प्लोर
एसटी संपात सहभागी कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापणार
सहा महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने संपकरी कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार आहे.
मुंबई : एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार आहे. संपकरी कर्मचाऱ्यांचा तब्बल 36 दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पगारवाढीची मागणी करत संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर असलेला पगारच कापला जाण्याची वेळ आली आहे.
सहा महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने संपकरी कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार आहे. या महिन्यातील चार दिवसाचा पगार कापला जाईल, तर उरलेल्या 32 दिवसांचा पगार पुढील सहा महिन्यात कापण्यात येईल.
चार दिवस पुकारलेला संप आणि त्यामुळे झालेल्या नुकसानभरपाई बाबत नियमानुसार एका दिवसामागे आठ दिवस असा 36 दिवसांचा पगार कापला जाणार आहे.
ही पगार कपात अन्यायकारक असल्याचं सांगत मान्यताप्राप्त एस टी कर्मचारी संघटना मुंबई औद्योगिक न्यायालयाकडे दाद मागणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, अखेर लालपरी रस्त्यावर
ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी चार दिवस संप पुकारला होता. मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदा ठरवल्यानंतर, एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता. त्यानंतर चार दिवसांपासून आगारात उभी असलेली लालपरी रस्त्यावर धावली. मुंबई हायकोर्ट काय म्हणालं होतं? ऐन दिवाळीत एसटी कमागार संघटनेनं पुकारलेला संप हा बेकायदेशीर असून, संपावर गेलेल्या कर्माचाऱ्यांनी तत्काळ कामावर रुजू व्हावं. अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी कारवाई करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला एसटीने प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला. संबंधित बातम्या एसटी संप चौथ्या दिवशीही सुरुच “एसटी कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहाबाहेर काढा आणि गुन्हे दाखल करा” उद्धव ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का? : इंटकचा सवाल एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आता मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार? प्रशासन एसटी संप चिघळवतंय: इंटक अन्य राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती?अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement