(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Mumbai Rains LIVE : मुंबईत पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, कुंभार्ली घाटात दरड कोसळली
Maharashtra Mumbai Rains Update Today : मुंबईसह, उपनगर आणि कोकणात पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं.
LIVE
Background
Maharashtra Mumbai Rains LIVE : सध्या मुंबईसह, उपनगर आणि कोकणात पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. यामुळं काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबई आणि कोकणासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली. जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत अल्प पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरु झाल्यानं शेतकरी आनंदी झाले आहेत. दरम्यान, राज्याच्या अन्य भागातही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
रायगड रत्नागिरीमध्ये NDRF च्या टीम तैनात
राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनडीआरएफच्या टीम रत्नागिरी, रायगडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे.
Mumbai Rain : कुर्ला नेहरुनगर विभागात तीन-चार फूट पाणी भरलं
मुंबईच्या कुर्ला नेहरूनगर विभागात तीन ते चार फूट पाणी भरले आहे. नेहरूनगर मधील वालावलकर स्कूलच्या बाहेर रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. वालावलकर शाळेतही तीन ते चार फूट पाणी भरले आहे
कोल्हापूर जिल्ह्यासाठी NDRF च्या दोन तुकड्या रवाना
Kolhapur Rain update : पंचगंगा नदीची पाणी पातळी 25 फूट 8 इंचावर पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण 15 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या पुण्याहून रवाना झाल्या आहेत.
कुंभार्ली घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प
कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. कुंभार्ली घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाराघाट आहे. कोकणातील येणाऱ्याची वाट बिकट झाली आहे. कोकणाला जोडणारे दोन प्रमुख मार्गावरील घाट वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. एक परशुराम घाट आणि दुसरा कुंभार्ली घाट.
बदलापूर बेलवली जवळील रेल्वेचा सब वे, भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद
महाड-पोलादपूरमध्ये अतिवृष्टीमुळं पूरस्थिती, प्रविण दरेकरांची घटनास्थळी धाव
रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर येथे अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळं विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी तातडीने आज सकाळी महाड येथे धाव घेतली.अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केली. महाड तालुक्यातील दासगाव येथे भली मोठी संरक्षक भिंत मोठ्या प्रमाणात खचली आहे. त्या संरक्षक भिंतीच्या खाली नागरी वस्ती आहे. त्यामुळे प्रविण दरेकर यांनी तातडीने येथे योग्य मदत कार्य करण्याच्यादृष्टीने तहसिलदार काशिद व अन्य अधिका-यांच्यासमेवत त्या भागाची पाहणी केली. तेथील लोकांना तातडीने अन्य सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देश दिले आहेत.