(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर नऊ वाहनांचा अपघात, बोरघाटात वाहनांची रांग
mumbai pune expressway Accident : खोपोली एक्झिटवर मल्टीव्हेईकल अपघात, आठ कार आणि खाजगी बसचा अपघात, मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांची रांग, सुमारे दोन ते तीन किलोमीटर वाहनांची रांग ...
Mumbai Pune expressway Accident : मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावरील बोरघाटात वाहनांची रांग लागली आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर नऊ वाहनांचा अपघात झाला होता. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रविवार असल्यामुळे मुंबईबाहेर गेलेले मुंबईकर घराकडे परतत आहेत. खोपोली एक्झिटवर मल्टीव्हेईकलवर आठ कार आणि खाजगी बसचा अपघात झाला. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांची रांग, सुमारे दोन ते तीन किलोमीटर वाहनांची रांग लागली आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलीस रस्ता मोकळा करण्याचं काम करत आहेत.
मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात खाजगी बस आणि नऊ वाहनांचा अपघात झाला आहे. यामुळे, मुंबईकडे येणारी वाहतुक विस्कळीत झाली असून सुमारे चार किलोमीटर वाहनांची रांग लागली आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास बोरघाटातील खोपोली एक्झिटजवळ भरधाव वाहनांचा अपघात झाला होता. यामुळे, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कार आणि खाजगी बसचा अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. यामध्ये, खाजगी बसने कारला ठोकर दिली असून एकूण नऊ वाहनांचा अपघात झाला आहे. तर, सायंकाळच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची रांग लागली होती. अपघातानंतर झालेली वाहतूक कोंडी पोलिसांकडून व्यवस्थित करण्यात येत आहे.
यामुळे, बोरघाटात सुमारे तीन ते चार किलोमीटर वाहनांची रांग लागल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तर, सुदैवाने या अपघातात कुणीही प्रवासी गंभीर जखमी झालेला नाही. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस, देवदूत, आयआरबी यंत्रणा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संघटनेचे सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला करण्यात आली. अपघातात किरकोळ जखमी झालेल्यांवर उपचार करण्यात येत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Chandrakant Khaire : किरीट सोमय्या म्हणजे शक्ती कपूर ; चंद्रकांत खैरेंचा हल्लाबोल
- Kirit Somaiya PC : माझ्यावर झालेला हल्ला ठाकरे सरकारकडून स्पॉन्सर्ड : किरीट सोमय्या
- Kirit Somaiya : मुंबईत राडा सुरूच, शिवसैनिकांच्या हल्ल्यामध्ये किरीट सोमय्या जखमी
- Treason: राजद्रोह म्हणजे नेमकं काय? कधी दाखल केला जाऊ शकतो गुन्हा, जाणून घ्या