एक्स्प्लोर

Kalyan Dombivli Shivsena and MNS Yuti: मोठी बातमी: कल्याण डोंबिवलीत मोठा ट्विस्ट, मनसेचे 7 नगरसेवक शिंदे सेनेला पाठिंबा देण्याची चर्चा, ठाकरे गटाला धक्का?

Kalyan Dombivli Mahangarpalika Election 2026: स्वप्नील केणे आणि राहुल कोट हे दोन नगरसेवक मनसेच्या गोटात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता मनसेच्या नगरसेवकांची संख्या 5 वरुन 7 इतकी झाली आहे.

Kalyan Dombivli Mahangarpalika Election 2026: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी सध्या नाट्यमय घडामोडी सुरु आहेत. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या मनसेकडून पाठिंबा दिला जाणार आहे. सध्या शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये कल्याण डोंबिवलीत महत्त्वाच्या राजकीय हालचाली घडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिल्यास कल्याण डोंबिवलीत ठाकरे बंधूंच्या पक्षांमध्ये वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करायची असेल तर 62 हा बहुमताचा आकडा गाठणे महत्त्वाचे आहे. सध्या शिंदे यांच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत. तर भाजपाकडे 50 नगरसेवक आहेत. तर या निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 आणि मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले होते. मात्र, निकालानंतर ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता झाले होते. हे दोन्ही नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा होती. अशातच ठाकरे गट कोकण विभागीय आयुक्तांकडे आपल्या गटाची नोंदणी करायला जाताना आणखी दोन नगरसेवक गैरहजर होते. हे नगरसेवक मनसेच्या गोटात गेल्याची चर्चा होती. त्यामुळे ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे संख्याबळ 11 वरुन सातवर आले होते. ठाकरे गटाचे जे दोन नगरसेवक मनसेत गेले होते, ते पूर्वी मनसेचे कार्यकर्ते होते. त्यामुळे आम्ही मनसेत गेल्याची भूमिका या दोन्ही नगरसेवकांनी घेतली आहे. आता हे दोन आणि मनसेचे निवडून आलेले 5 नगरसेवक असे 7 नगरसेवक सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतात. शिंदे गटाचे नेते यासंदर्भात मनसेशी चर्चा करत असले तरी यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. 

Sanjay Raut: मनसेच्या नगरसेवकांवर संजय राऊत नाराज

ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून येऊन पुन्हा मनसेत गेलेल्या नगरसेवकांबद्दल संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. कल्याण डोंबिवलीत जे नगरसेवक गट बनवण्यासाठी उपस्थित राहत नाहीत, त्यांच्यावर अपात्रतेसंदर्भातील कारवाई सुरु आहे. ती कारवाई यशस्वी होईल, ते कुठेही गेलेले असू द्या. ते पक्षाची आचारसंहिता आणि निवडणुकीची आचारसंहिता पाळत नसतील तर त्यांच्यावर कारवाई होईल. ते दोन्ही नगरसेवक मनसेचे कार्यकर्ते असले तरी ते मशालीच्या चिन्हावर निवडून आले आहेत. ते पूर्वी मनसेचे कार्यकर्ते होते, हा निकष लावायचा झाला तर आज भाजपमध्ये गेलेले अनेकजण काँग्रेसचे आहेत आणि राष्ट्रवादीचे अनेक विजयी उमेदवार शरद पवार गटाचे आहेत. पण म्हणून त्यांना परत बोलावता येणार नाही. काही गोष्टी नैतिकता आणि नितिमत्तेला धरुन कराव्यात, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Shivsena & MNS Alliance: शिंदे गटाच्या नगरसेवकांची आज गट नोंदणी

कल्याण–डोंबिवलीतील शिंदे गटाचे 53 नगरसेवक बुधवारी सकाळी कोकण भवनच्या दिशेने रवाना झाले. कोकण भवनात शिंदे गटाच्या नगरसेवकांच्या गटाची नोंदणी केली जाईल. शिवसेनेचा अधिकृत गट स्थापन करण्यासाठी काल  बैठक देखील पार पडली होती.

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचीच सत्ता येणार, 10 उमेदवार बिनविरोध, शेकापचे बाबासाहेब पाटीलही भाजप पुरस्कृत पॅनेलमध्येच
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचीच सत्ता येणार, 10 उमेदवार बिनविरोध, शेकापचे बाबासाहेब पाटीलही भाजप पुरस्कृत पॅनेलमध्येच
Eknath Shinde: रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
भाजपा कार्यकर्त्याची माघार, जळगाव जिल्हा बँकेसाठी गिरीश महाजन बिनविरोध; गुलाबराव पाटीलही जिंकले
भाजपा कार्यकर्त्याची माघार, जळगाव जिल्हा बँकेसाठी गिरीश महाजन बिनविरोध; गुलाबराव पाटीलही जिंकले
Ajit Pawar Plane Crash :अजित पवार प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई पोलीस आणि डीजीसीएचा नकार,बारामतीमधील वकिलाचा दावा
अजित पवार प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई पोलीस आणि डीजीसीएचा नकार,बारामतीमधील वकिलाचा दावा

व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Eknath Shinde: रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
Pune Crime Daund: आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
Mumbai Local Crime News: अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
भाजपा कार्यकर्त्याची माघार, जळगाव जिल्हा बँकेसाठी गिरीश महाजन बिनविरोध; गुलाबराव पाटीलही जिंकले
भाजपा कार्यकर्त्याची माघार, जळगाव जिल्हा बँकेसाठी गिरीश महाजन बिनविरोध; गुलाबराव पाटीलही जिंकले
Embed widget