एक्स्प्लोर

'शिवसेनेला कठीण पेपर सोडवायला आवडतात', महापौर किशोरी पेडणेकरांचे नारायण राणेंना प्रत्युत्तर

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणेंनी शिवसेनेवर टीका केली. या टीकेचा समाचार मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने तयारीला सुरुवात केली असून सत्ताधारी शिवसेनेच्या समोर थेट नारायण राणे यांचं आव्हान भाजपने पुढे केले आहे. त्यामुळे शिवसेनेला ही निवडणूक कठीण जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहे. तसेच जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. या टीकेचा समाचार मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला आहे.

शिवसेनेला कठीण पेपर सोडवायला आवडतात

येणाऱ्या निवडणुकीत मुंबई महापालिका तुमच्या हातात राहणार नाही असे नारायण राणे म्हणाले. राणेंच्या आव्हानाला महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "शिवसेना कधीच कोणती निवडणूक सोपी समजत नाही. निवडणूक कठीणच असते आणि शिवसेनेला कठीण पेपर सोडवायला आवडतात", असे म्हणत  महापौर किशोरी  पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री होते तेव्हा पापाचा घडा दिसला नाही का?

गेली 32 वर्षांपासून शिवसेनेकडे मुंबई महानगरपालिकेची सत्ता आहे. मात्र अजूनही मुंबईकरांच्या जीवनात काही बदल झालेले नाहीत. 32 वर्षाचा पापाचा घडा फोडणार अशी राणेंनी  भाषा केली आहे. देशात लोकशाही असल्याने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. परंतु  या 32 वर्षात राणे स्वत: मुख्यमंत्री झाले, महानगरपालिकेचे सदस्य होते. मग तेव्हा पापाचा घडा दिसला नाही का? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला.

नारायण राणेंचा राजकीय प्रवास सर्वांना माहिती आहे

जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले अशी टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना महापौर पेडणेकर म्हणाल्या, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोलण्याआधी त्यांनी कोरोना काळात महाराष्ट्राला, मुंबईला कसं सांभाळलं आहे हे सर्वांनी पाहिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत एका सर्वेक्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय ठरले आहेत. नारायण राणेंचा राजकीय प्रवास काय आहे ते सर्वांनाच माहित आहे.

संबंधित बातम्या :

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेपुढे भाजपकडून नारायण राणे यांच आव्हान

जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणेंचा हल्लाबोल, म्हणाले उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उध्वस्त करायला निघालेत, तर फडणवीस म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Maharashtra Live blog updates: राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....';
Maharashtra Live blog updates: राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....';
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
Sanjay Raut on PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी सलग दोन रात्री इन्स्टाग्रामवर फ्रंट कॅमेऱ्याने शूट करुन व्हिडीओ टाकले, संजय राऊत म्हणाले, 'ते कधीच तुमचे फ्रेंड होणार नाहीत'
पंतप्रधान मोदींनी सलग दोन रात्री इन्स्टाग्रामवर फ्रंट कॅमेऱ्याने शूट करुन व्हिडीओ टाकले, संजय राऊत म्हणाले, 'ते कधीच तुमचे फ्रेंड होणार नाहीत'

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Embed widget