एक्स्प्लोर

Mumbai Crime News : बेस्ट बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्यांना अटक

Mumbai Crime News : गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या चोरांना पोलिसांनी अटक केली असून पोलिसांनी या चोरट्यांना रंगेहात पकडले आहे.

Mumbai Crime News : मुंबईच्या (Mumbai) बेस्ट बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी (Mobile Theft) करण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पण कांदिवली पोलिसांनी (Police) या चोरट्यांना रंगेहात पकडत अटक केली आहे. कांदिवली पश्चिम परिसरात बेस्ट बसमध्ये (BUS) हा प्रकार घडत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या चोरांमुळे नागरिकांना खूप त्रास होत असल्याचं सांगण्यात येत होतं. तसेच अनेक जणांचे फोन या गर्दीमुळे चोरीला गेले होते. त्यामुळे फोनमधील महत्त्वाची माहितीचा चुकीचा फायदा घेण्याची भीती देखील नागरिकांना वाटत होती. 

पण रविवार (6 ऑगस्ट) रोजी कांदिवली पश्चिम परिसरात बस क्रमांक 277 चोरीचा प्रकार घडला. त्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन हे चोरटे फोन चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. पण पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. विशेष म्हणजे हे चोरटे चोरीच्या फोनची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या मालवणी परिसरात मोबाईल विक्री आणि दुरुस्तीचे दुकान सुरु केले होते. यामुळे या चोरट्यांचा सुळसुळाट या परिसरात झाला होता. त्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अनेक प्रयत्न करण्यात येत होते. पण अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. 

या प्रकरणात पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये सलीम रईस शेख (24 वर्ष ), अल्ताफ तुरब अली रूपाणी (44 वर्ष), शहाद इसाफ खान (43 वर्ष),  रमजान बाबामिया लांजेकर (51 वर्ष) आणि हमीद अहमद खान (42 वर्ष) अशी आरोपींची नावे आहेत. नागरिकांना या चोरट्यांमुळे गर्दीच्या ठिकाणी त्यांच्या मौल्यवान वस्तू सांभाळणे कठिण झाले होते. कांदिवलीच्या या परिसरात बसमध्ये नेहमीच वर्दळ असते. अशा वेळी गर्दीचा फायदा घेणं या चोरट्यांच्या सोयीचं झालं होतं.

या टोळीने  मुंबईच्या मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या परिसरात चोरीचं सत्र सुरु केलं होतं.या परिसरात गर्दीचा फायदा घेऊन ही टोळी मोबाईल चोरी करायची.  दरम्यान पोलिसांनी यांच्याकडून  एकूण 74 मोबाईल हस्तगत केले आहेत. तर या मोबाईलची किंमत ही जवळपास  7 लाख 35 हजार इतकी आहे. सध्या या पाचही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर या टोळीमध्ये आणखी कोणी सक्रिय आहे का हे पाहणं गरजेचं आहे. तसेच या संदर्भात पोलिसांकडून अधिक तपास देखील करण्यात येत आहे. त्यामुळे आता तरी गर्दीचा फायदा घेणाऱ्या या चोरट्यांना आळा बसणार का हा सवाल उपस्थित केला जात आहे. 

हेही वाचा : 

Vasai Virar News : वसई विरारमध्ये घर घेताय तर मग वेळीच व्हा सावधान, बनावट शिक्के आणि लेटरहेड बनवणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget