एक्स्प्लोर

प्लास्टिकबंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

राज्य सरकारनं ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत प्लास्टिकबंदी कायद्यानुसार कुणावरही कठोर कारवाई करु नये, असं मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे.

मुंबई : प्लास्टिकबंदीच्या निर्णयावर स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. मात्र राज्य सरकारनं ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत प्लास्टिकबंदी कायद्यानुसार कुणावरही कठोर कारवाई करु नये, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारच्या तरतुदीनुसार ग्राहक, वितरक आणि उत्पादक अशा सर्वांनी तीन महिन्यांत त्यांच्याजवळ असलेला प्लास्टिकचा साठा दिलेल्या निर्देशांनुसार प्रशासनाकडे जमा करावा, असं हायकोर्टाने सांगितलं. नागरिकांनी त्यांच्याजवळ असलेल्या प्रतिबंधित प्लास्टिक बॉटल्स रिसायकलिंगसाठी स्थानिक प्रशासनाकडे जमा कराव्यात, अशा सूचनाही मुंबई हायकोर्टाने दिल्या. प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होत आहे. भविष्याचा विचार करता पर्यावरणाचं संवर्धन करणं महत्त्वाचं असल्याचं मत निकाल देताना मुंबई हायकोर्टाने व्यक्त केलं. प्लास्टिक बंदीविरोधातील याचिकेचा फैसला उद्या! राज्यभरातील प्लास्टिक उत्पादक संघटना आणि वितरकांनी प्लास्टिक बंदीला विरोध करत याचिका दाखल केल्या होत्या. हायकोर्ट हे आंदोलनाचं ठिकाण नाही, या शब्दांत हायकोर्ट परिसरात काळे कपडे, काळ्या रिबिनी लावून मोठ्या संख्येनं जमलेल्या याचिकाकर्त्यांच्या संघटनेची मुंबई हायकोर्टाने काल चांगलीच खरडपट्टी काढली होती. अध्यादेश जारी केल्यापासून प्लास्टिक बंदीच्या पूर्ण अंमलबजावणीस राज्य सरकारडून तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. दंड आकारला नाही तर बंदीचा काय उपयोग?, नद्या, नाले, समुद्र सगळीकडेच प्लास्टिकच्या बाटल्यांचं प्रदूषण फोफावलंय असं स्पष्टीकरण राज्य सरकाराने दिलं होतं. राज्य सरकारने पेट बॉटल्सची जाडी, रुंदी, मायक्रॉन याविषयी कोणतेही निकष स्पष्ट केलेले नाहीत असा आरोप करत याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. राज्य सरकारने किमान तीन महिने प्लास्टिकबंदीच्या निर्णयावर स्थगिती आणावी आणि समितीकडे म्हणणं मांडण्याची संधी द्यावी, अशी याचिकाकर्त्यांची प्रमुख मागणी होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्तTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 23 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
Embed widget