एक्स्प्लोर

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी 10 जणांना हायकोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी 10 आरोपींची ओळख न पटल्यानं जामीन मंजूर करत असल्याचं हायकोर्टानं अधोरेखित केलं आहे.

पालघर : पालघर जिल्ह्यातील साधूंच्या (Palghar mob lynching case) सामुहिक हत्याकांड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालायाने 10 आरोपींची ओळख न पटल्यानं, पुराव्यांअभावी 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचल्यावर सशर्त जामीन मंजूर केला. तर अन्य आठ आरोपींचा त्या हल्ल्यात सहभाग असल्याचं पुराव्यांनिशी निष्पन्न होत असल्याचं स्पष्ट करत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.  

पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ 16 एप्रिल 2020 रोजी चोर-दरोडेखोरांच्या अफवेमुळे गस्त घालणाऱ्या जमावाकडून काही जणांवर हल्ला करण्यात आला. चोर समजून गुजरातमधील सुरत इथं अंत्यसंस्कारासाठी चाललेल्या दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची निघृणपणे दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली होती. प्राथमिक तपासानंतर पालघर पोलिसांकडून हे प्रकरण राज्य गुन्हे शाकेकडे वर्ग करण्यात आलं. याप्रकरणी शेकडो जणांना अटक करून त्यांच्यावर ठाणे सत्र न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयातही राज्य सरकारकडून दोन सीलबंद अहवाल सादर करण्यात आलं आहेत. त्यापैकी काहींना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयानं यापूर्वीच जामीन मंजूर केला होता.

जामीन न मिळालेल्या काही आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर शुक्रवारी सुनावणी पार पडली. तेव्हा, त्या रात्री 400 ते 500 जणांच्या जमावानं एकत्रितपणे या हिंसाचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे, अटक करण्यात आलेल्यांपैकी मोहन गावित, इश्वर निकोळे, फिरोज साठे, राजू गुरूड, विजय पिलेना, रिशा पिलेना, दीपक गुरूड, सीताराम राठोड, विजय गुरूड, रत्ना भवर यांची ओळख न पटल्याने त्यांना 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रक्कमेच्या दोन जणांच्या हमीपत्रावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला अथवा साक्षीदाराला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष भेटण्याचा, धमकी देण्याचा प्रयत्न करू नये, कोणत्याही पुराव्यांशी छेडछाड करू नये, अशा विविध अटीशर्ती हा जामीन मंजूर करताना हायकोर्टाकडून घालण्यात आल्या आहेत.

याच प्रकरणातील अन्य आरोपी राजेश राव, रामदास राव, भाऊ साठे, हवसा साठे, राजल गुरूड, महेश गुरूड, लहान्या वालकर,  संदेश गुरूड या आरोपींची त्या रात्रीच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये, तसेच अन्य काही मोबाईल क्लिपर ओळख पटली आहे. त्यांच्यापैकी अनेकांकडे लाकडी काठ्या, लाकूड, कुऱ्हाडी इत्यादी हत्यारे व्हिडिओमध्ये स्पष्ट आढळून आली आहेत. तसेच हे आरोपी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करताना आणि मृतांना लाठ्या-काठ्या मारतानाही सीसीटीव्हीमध्ये दिसून आलेलं होते. इतकंच नव्हे तर हे आरोपी लोकांना या जमावात सामील होण्यासाठी आणि तिन्ही साधूंवर हल्ला करण्यासाठी चिथावतानाही दिसल्याचं आपल्या निकालात नमूद करत पुराव्यांच्या आधारावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी या आठ आरोपींना दिलासा देण्यास नकार देत त्यांची जामीनासाठीची याचिका फेटाळून लावली.

संबंधित बातम्या :

Palghar Mob Lynching Case : पालघर झुंडबळीला घटनेला एकवर्ष पूर्ण; भाजपच्यावतीनं मुंबई, नाशिक, पालघरसह काही ठिकाणी आंदोलनाचा इशारा

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार
ठाकरे गटाच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
PSU Banks : केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha at 730AM 15 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 15 January 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 15 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार
ठाकरे गटाच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
PSU Banks : केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
Embed widget