नालासोपारा हादरलं! दहा वर्षीय चिमुकलीवर दोन जणांकडून लैंगिक अत्याचार; एकला अटक, तर एक फरार
Mumbai Crime : नालासोपारा (Nalasopara) येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.नालासोपारात येथे एका दहा वर्षीय मुलीवर दोन जणांनी सहमूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नालासोपारा Nalasopara : राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या (Sexually Assault) घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. अशातच मुंबईच्या नालासोपारा (Nalasopara) येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.नालासोपारात येथे एका दहा वर्षीय मुलीवर दोन जणांनी सहमूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. नालासोपारा पूर्वेच्या आचोळे रोड पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपीचाही शोध पोलीस घेत आहेत.
निर्जनस्थळी नेत केला अत्याचार, एकला अटक तर एक फरार
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. दरम्यान 2 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी निमित्य गणेश आगमन सोहळा पाहण्यासाठी मुलगी गेली होती. तेथून घरी परत असताना घराच्या जवळ परिसरातून दोघा आरोपीने तिला रस्त्यात अडवून तिला निर्जनस्थळी नेलं, आणि तिच्यावर अत्याचार केला. कालांतराने तिची प्रकृती ठीक नसल्याने कुटुंबीयांनी मुलीची चौकशी केली असता, घडलेला सर्व प्रकार उघडकीस आला.
न्यायालयाने सुनावली 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान, पीडित मुलीच्या आईने आचोळे पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला आणि तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ६४ (१), ६५ (२), ७० सह पॉस्कोचा गुन्हा दाखल करून एका संशयित आरोपीला अटक केली आहे. तर यातील आणखी एक संशयित आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे. पकडण्यात आलेल्या संशयित आरोपीला वसई न्यायालयाने 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली आहे.
आत्याचारांच्या घटनेने नालासोपारा हादरलं
महाराष्ट्र राज्य ही संतांची, महापुरुषांची भूमी आहे, ज्या राज्यात महिलांना आईचा बहिणींचा मान मिळतो, त्याच महाराष्ट्रात मुली व महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढत होत आहे. बदलापुरची घटना ताजी असतानाच आज नालासोपार्यात एका दहा वर्षीय मुलीवर दोन जणांनी सहमूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर काही दिवसांपूर्वी नालासोपार्यातच 17 वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याचीही घटना घडली होती. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणारी 17 वर्षीय पिडीत मुलीची एक मैत्रीण नालासोपार्यात राहते. तिला भेटण्यासाठी ती अधून मधून नालासोपार्याला यायची. मैत्रीणीच्या घराशेजारी असणाऱ्या एका फोटो स्टुडियोत काम करणार्या तरुणाची तिची मागच्या आठवड्यात ओळख झाली होती. गुरुवारी 25 वर्षीय सोनू नामक तरूणाने तिला भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार पीडित नालासोपारा स्थानकात आली. यावेळी आरोपी सोबत त्याचा मित्र होता. फिरण्याच्या बहाण्याने ते तिला रिक्षातून घेऊन गेले. काही वेळाने तिला नगीनदासपाडा येथील एका निर्जनस्थळी आणले. तेथे आळीपाळीने दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडीत मुलीने घरी जाऊन आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
