Exclusive : संपत्तीच्या लालसेपोटी मुलाकडून आईची निर्घृण हत्या, मृतदेह पेटीत भरून माथेरानच्या नदीत फेकला.
Mumbai Crime News : जुहू पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित कुमार वर्तक यांनी सांगितले की, 6 डिसेंबर रोजी मुलगा त्याच्या आईची हरवल्याची तक्रार घेऊन आला होता
Mumbai Crime News : मुंबईमध्ये (Mumbai Crime News) मुलाने नोकराच्या मदतीने स्वत:च्या आईची (Mother) निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी (Juhu Police) मुलगा सचिन कपूर आणि नोकर छोटू उर्फ लालूकुमार मंडल या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, वीणा कपूर असे मृत आईचे नाव असून तिचे वय 74 वर्षे होते.
बेसबॉल बॅटने खून
जुहू पोलिसांनी सांगितले की, 6 डिसेंबर रोजी माय-लेकामध्ये मालमत्तेवरून वाद झाला, त्यानंतर आरोपी मुलगा सचिन कपूरला राग आला, त्याला राग आवरता न आल्याने नोकर छोटूशी हातमिळवणी करून स्वतःच्या आईची हत्या केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही आरोपींनी आधी वीणाला हात-पाय मारले. नंतर बेसबॉलच्या बॅटने आईला मारहाण केली, अति मारहाण झाल्यानंतर वीणाचा मृत्यू झाला.
पुरावे नष्ट करण्यासाठी आईचा मृतदेह नदीत फेकून दिला
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आईची हत्या केल्यानंतर, सचिन आणि छोटूने पुरावे नष्ट करण्यासाठी आईचा मृतदेह एका बॉक्समध्ये भरला. नंतर कोठूनही काहीही दिसू नये म्हणून बॉक्स व्यवस्थित पॅक केले. ज्या घरात खून झाला, त्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला होता, त्यानंतर आरोपींनी घराचे सीसीटीव्ही फुटेज ठेवलेले डीव्हीआर काढले आणि तेही नष्ट केले. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींनी वीणाचा मृतदेह बॉक्समध्ये पॅक करून मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील माथेरान भागात असलेल्या नदीत फेकून दिला. एवढेच नाही तर आरोपींनी त्याच नदीत डीव्हीआरही फेकून दिला.
खूनाचा उलगडा कसा झाला?
जुहू पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित कुमार वर्तक यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, 6 डिसेंबर रोजी आरोपी मुलगा त्याच्या आईची हरवल्याची तक्रार घेऊन आला होता, ज्यामध्ये त्याने आई बेपत्ता असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यात हे लोक एक मोठी पेटी इकडे तिकडे हलवत असल्याचे समजले. त्यावेळी त्यांची चौकशी केली असता त्यांनी खुनाबाबत माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंवि कलम 302,201 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
इतर बातम्या