एक्स्प्लोर
12 मार्च, 12 स्फोट: 1993 मध्ये कुठे आणि कसे स्फोट झाले?
मुंबई : मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटाने अवघ्या देशाला हादरवलं. देशातील हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट होता.
या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला 2015 मध्ये नागपूर सेंट्रल जेलमध्ये फासावर लटकवण्यात आले. बॉम्बस्फोटातील पीडितांना तब्बल 22 वर्षांनंतर पहिला न्याय मिळाला.
त्यानंतर उर्वरित 7 आरोपींपैकी 6 जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मुस्तफा डोसा, अबू सालेमसह 6 आरोपींना दोषी ठरवलंय आहे. तर एकाची निर्दोष म्हणून सुटका करण्यात आली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि याकूबचा भाऊ टायगर मेमन बॉम्बस्फोटाचे मास्टरमाईंड आहेत. मात्र, त्यांना अद्याप पकडण्यात यश आलेलं नाही.
13 मार्च 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात तब्बल 257 लोकांचा मृत्यू झाला. कुणी आपली आई..तर कुणी बाबा…कुणी भाऊ, तर कुणी बहीण गमावली. या स्फोटात शेकडो लोक जखमी झाले, ज्यांच्या जखमा अजूनही भरल्या नाहीत.
12 मार्च 1993 रोजी काय झालं ?
पहिला स्फोट : 12 मार्चच्या दुपारी मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीबाहेर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी देशाला हादरवणारा पहिला बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाचा आवाज काही किलोमीटरपर्यंत पोहोचला. स्टॉक एक्सेंजच्या 29 व्या मजल्यावरील माणूसही जागच्या जागी पडला, एवढा मोठा हा स्फोट होता. स्फोटाच्या आजूबाजूला रक्ताचा सडा वाहू लागला. स्फोटाठिकाणी जवळपास 2 हजार लोकांची गर्दी होती. बेसमेंटच्या पार्किंगमध्ये आरडीएक्सनी भरलेल्या एका कारमध्ये हा स्फोटा झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजबाहेरील या स्फोटात 84 लोकांचा मृत्यू आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले.
दुसरा स्फोट : दुपारी 2.15 वाजता, नरसी नाथ स्ट्रीट
तिसरा स्फोट : दुपारी 2.30 वाजता, शिवसेना भवन
चौथा स्फोट : दुपारी 2.33 वाजता, एयर इंडिया बिल्डिंग
पाचवा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, सेंच्युरी बाजार
सहावा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, माहिम
सातवा स्फोट : दुपारी 3.05 वाजता, झवेरी बाजार
आठ स्फोट : दुपारी 3.10 वाजता, सी रॉक हॉटेल
नववा स्फोट : दुपारी 3.13 वाजता, प्लाझा सिनेमा
दहावा स्फोट : दुपारी 3.20 वाजता, जुहू सेंटॉर हॉटेल
अकरावा स्फोट : दुपारी 3.30 वाजता, सहार विमानतळ
बारावा स्फोट : दुपारी 3.40 वाजता, विमानतळ सेंटॉर हॉटेल
बॉम्बस्फोटानंतर काय झालं?
- 4 नोव्हेंबर 1993 रोजी 10 हजार पानांचं 189 जणांविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल
- 19 नोव्हेंबर 1993 रोजी प्रकरणं सीबीआयकडे सुपूर्द
- 19 एप्रिल 1995 रोजी मुंबईतील टाडा कोर्टात सुनावणी सुरु
- टाडा कोर्टाकडून आरोपींविरोधात आरोप निश्चिती
- ऑक्टोबर 2000 मध्ये सरकारी पक्षाच्या साक्षीदारांचे जबाब घेतले गेले
- ऑक्टोबर 2001 मध्ये सरकारी पक्षाचा युक्तीवाद पूर्ण
- सप्टेंबर 2003 मध्ये संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण
- सप्टेंबर 2006 मध्ये कोर्टाने निर्णय देणं सुरु केलं
- या प्रकरणात एकूण 123 आरोपी होते, ज्यामधील 12 जणांना कनिष्ठ कोर्टाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. यामधील 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, ज्यामधील दोघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इतर 68 जणांना जन्मठेपेहून कमी शिक्षा सुनावली गेली होती. मात्र, त्यातील 23 जण निर्दोष सुटले.
- नोव्हेंबर 2006 मध्ये बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला पिस्तूल आणि एके-56 रायफल्स ठेवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.
- 1 नोव्हेंबर 2011 मध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली
- सुप्रीम कोर्टात 10 महिने सुनावणी सुरु राहिली
- ऑगस्ट 2012 मध्ये सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला. 2006 साली मुंबई कोर्टाने सुनावणीत निर्णय दिला, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश होता. त्यामध्ये याकूब मेमन, यूसूफ मेमन, इसा मेमन आणि रुबिना मेमन यांचा समावेश होता. या सर्वांवर बॉम्बस्फोटाचा कट आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.
- मुंबईच्या टाडा कोर्टाने याकूबला फाशी सुनावल्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. अनेक वाद-विवादांनंतर अखेर 30 जुलै 2015 रोजी सकाळी 7 वाजता याकूब मेमनला फाशी देण्यात आली.
- सप्टेंबर 2012- मेमन कुटुंबातील 4 सदस्यांना कोर्टाने दोषी ठरवलं.
- 21 मार्च 2013- सुप्रमी कोर्टाने याकूब मेमनची फाशी कायम ठेवली. इतर 10 जणांची फाशी जन्मठेपेत बदलली. आधी जन्मठेप सुनावलेल्या 18 पैकी 16 जणांची जन्पठेप सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली
- 30 जुलै 2013- याकूब मेमनची पहिली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
- 14 ऑगस्ट 2013- डेथ वॉरन्टची तारिख निश्चित झाली
- 11 एप्रिल 2014- राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी याकूब मेमनची दया याचिका फेटाळली
- 2 जून 2014- फाशीच्या शिक्षेविरोधात याकूब मेमनने केलेल्या पुनर्विचार याचिकेवर चेंबरऐवजी ओपन कोर्टमध्ये सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
- 9 एप्रिल 2015- फाशीविरोधातील दुसरी पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
- 21 जून 2015- 30 जुलैला होणारी फाशी रोखण्यासाठी याकूब मेमनची सुप्रीम कोर्टात धाव
- 27 जुलै 2015- क्युरेटिव्ह पिटीशनच्या सुनावणीवरुन वाद
- 28 जुलै 2015- सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांमध्ये याकूबवरुन मतभेद
- 29 जुलै 2015- सुप्रीम कोर्टाने याकूबची फाशीविरोधातील याचिका फेटाळली. राष्ट्रपतींनीही दयायाचिका फेटाळली.
- 30 जुलै 2015- सकाळी 7 वाजता याकूब मेमनला नागपूर सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement