Mumbai Baroda Highway Scam : मुंबई-बडोदा महामार्गात भूसंपादन घोटाळा, दुसऱ्या व्यक्तीच्या नावे हडपले 2 कोटी 8 लाख रूपये
Mumbai Baroda Highway Scam : मुंबई बडोदा महामार्गात मोठा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. या महामार्गातील मोबदल्याची 2 कोटी 8 लाख रूपयांची रक्कम घेऊन दुसऱ्याच व्यक्तीला दिल्याचे उघड झाले आहे.
![Mumbai Baroda Highway Scam : मुंबई-बडोदा महामार्गात भूसंपादन घोटाळा, दुसऱ्या व्यक्तीच्या नावे हडपले 2 कोटी 8 लाख रूपये mumbai baroda highway scam 2 Crore 8 Lakh rupees were stolen in the name of another person Mumbai Baroda Highway Scam : मुंबई-बडोदा महामार्गात भूसंपादन घोटाळा, दुसऱ्या व्यक्तीच्या नावे हडपले 2 कोटी 8 लाख रूपये](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/27/87c1ee2e12717b92bafe893ecc82fa1b1672140784840328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Baroda Highway Scam : मुंबई बडोदा महामार्गात मोबदला घोटाळा (Mumbai Baroda Highway Scam) झाल्याचे समोर आले आहे. ज्यांच्या नावे जागा नाही त्यांच्या नावावर मोबदल्याची 2 कोटी 8 लाख रूपयांची रक्कम घेऊन ती दुसऱ्याच व्यक्तीला दिल्याचे उघड झाले आहे. मोहम्मद शाहीद मिठाईवाला यांनी याबाबत तक्रार दाखल केली असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शाहीद मिठाईवाला हे कल्याणनजीक बल्याणी गावात राहतात. मुंबई वडोदरा महामार्गाच्या प्रकल्पात त्याची जागा बाधित होत नसताना त्यांच्या नावाने दुसऱ्या व्यक्तिला 2 कोटी 8 लाख रुपये मोबदल्याची रक्कम वाटप करण्यात आली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मिठाईवाला यांनी कल्याण प्रांत कार्यालयाकडे याबाबत तक्रार केली आहे. या प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
कल्याण जवळ असलेल्या बल्यानी येथे मिठाईवाला हे 2011 पासून राहतात. त्यांची दुसऱ्या ठिकाणी जागा आहे. याच बल्याणी गावातील काही जमीन मुंबई बडोदरा महामार्ग बाधित होत आहे. या बाधितांना शासनाकडून मोबदला देण्यात येतोय. मात्र या ठिकाणी जागा किंवा बांधकाम नसताना मिठाईवाला यांच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीला मोबदला देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मोबदल्याची रक्कम एक वर्षभरापूर्वीत दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आली आहे. परंतु, मिठाईवाला हे अलीकडीत काली दिवसांपूर्वी कल्याण प्रांत कार्यालयास गेले होते, त्यावेळी त्यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांच्या नावे जागा नसताना त्यांच्या नावाचा आणि फोटाचा वापर करुन प्रांत कार्यालयात संमती पत्र देत निवाडा करण्यात आला आहे. त्यांच्या नावाने अन्य दुसऱ्याच व्यक्तीने मोबदला लाटला आहे. हा निवडा त्यांच्या नावाचा गैरवापर करुन करण्यात आला आहे. त्यामुळे हा निवाडा रद्द करण्यात यावा, त्यांच्या नावाने दिलेली 2 कोटी 8 लाख रुपयांची रक्कम सरकार दफ्तरी जमा करण्यात यावी अशी मागणी मिठाईवाले यांनी केली आहे. मिठाईवाला यांचा तक्रार अर्ज कार्यालयास प्राप्त झाला आहे. या प्रकरणाची शहानिशा केली जाईल. तसेच या प्रकरणात सुनावणी घेत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी दिली आहे.
Mumbai Baroda Highway Scam : मृत महिलेला जिवंत दाखवून 58 लाख केले हडप
दरम्यान, यापूर्वी देखील या महामार्गाच्या भूसंपादनात मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. महामार्गाच्या भूसंपादनामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जागी बनावट शेतकरी उभे करून सुमारे 12 कोटी रुपये हडपल्याचे समोर आले होते. त्यानंतर एका वयोवृद्ध मृत आदिवासी महिलेच्या नावे असलेल्या जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी दलालांच्या साखळीने मृत महिलेच्या जागी एका महिलेच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार उपविभागीय अधिकारी कार्यालयात जिवंत दाखवून तब्बल 58 लाख रुपये दलालांच्या साखळीने हडप केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आले होते.
महत्वाच्या बातमम्या
मुंबई- बडोदा महामार्गातील अजब घोटाळा, मृत महिलेला जिवंत दाखवून 58 लाख केले हडप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)