गटार साफ करताना मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या अंगावरुन गेला टेम्पो, 3 जण गंभीर जखमी, कामगार दिनादिवशीच धक्कादायक घटना
मुंबई महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांकडून गटार साफसफाईचे काम सुरु असताना त्यांच्या अंगावर टेम्पो गेल्यामुळे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
Mumbai Accident News : मुंबईच्या पवई परिसरात कामगार दिनादिवशीच धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांकडून गटार साफसफाईचे काम सुरु असताना त्यांच्या अंगावर टेम्पो गेल्यामुळे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पालिकेच्या कॉन्ट्रॅक्टर कडून कामगार दिवस असताना गटार साफसफाई करण्याचे काम सुरु करण्यात आले होते. यावेळी गटारवरुन टेम्पो गेल्यामुळे तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
दोन जणांची स्थिती गंभीर
मिळालेल्या माहितीनुसार, पालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरकडून रस्त्यावर सुरक्षा रक्षक न उभ्या केल्यामुळे ही धक्कादायक घटना घडली आहे. आज कामगार दिवस आहे आणि कामगारांना सुट्टी आहे. मात्र पवई परिसरात पालिकेकडून तबरेज सय्यद अली या व्यक्तीचा कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून रस्ता वर असलेला गटार ची साफसफाई सुरू होती. कामगारांच्या काम करण्याच्या ठिकाणी फुटपाथवर टेम्पो चढून तीन माणसांचा अपघात झाला त्यामध्ये दोन जण खूप गंभीर जखमी अवस्थेत आहेत, तर एक जण किरकोळ जखमी आहे.
पवई पोलीस पुढील तपास करत आहेत
सध्या पवई पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कामगारांना उपचारासाठी जवळचा रुग्णालयामध्ये शिफ्टिंग केले आहे. तर यामध्ये चूक कोणाचा आहे यासंदर्भात गुन्हा दाखल करून पवई पोलीस पुढील तपास करत आहेत.
पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू
पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबई वाहिनीवर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. चिंचपाडा हद्दीत संध्याकाळी ही अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पुष्पाबेन लाड (60) असं मृत महिलेचं नाव आहे. तर 15 प्रवासी जखमी झाले आहेत. ट्रेलरने ट्रॅव्हलरला पाठीमागून धडक दिल्यानं दिल्यानं हा भीषण अपघात झाला.
ट्रेलरने ट्रॅव्हलरला दिली पाठीमागून जोरदार धडक
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, 17 प्रवाशांना घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हलर गाडीचा मागचा टायर अचानक फुटल्याने चालकाने वाहन हळू केले. याच दरम्यान मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलरने ट्रॅव्हलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार गुजरात मधील बिलीमोरा येथील लाड कुटुंबीय आपल्या मुलीला मुंबई विमानतळावर सोडण्यासाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस आणि मनोर महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य करत सर्व जखमींना प्राथमिक उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या काहींना पुढील उपचारासाठी धुंदलवाडी आणि गुजरात येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
Before You Go
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या





















