एक्स्प्लोर

MSRTC: राज्यातील ST महामंडळाच्या 1485 हेक्टर जागांच्या खासगीकरणाचा घाट, उत्पन्नवाढीच्या नावाखाली मोक्याच्या जागांवर डोळा

MSRTC: राज्यातील सर्वसामान्यांची वाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संदर्भात एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे.

MSRTC: राज्यातील सर्वसामान्यांची वाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) संदर्भात एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. एसटी महामंडळाच्या मालकीच्या राज्यभरातील तब्बल 1485 हेक्टर मोक्याच्या जागांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एसटी महामंडळाच्या बस डेपो आणि आगारांच्या या मौल्यवान जागा सार्वजनिक-खासगी भागीदारी म्हणजेच 'पीपीपी' (PPP) तत्त्वावर विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर एक महत्त्वपूर्ण सादरीकरण केले जाणार आहे.

परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्र्यांसमोर हा संपूर्ण आराखडा सादर करणार असून, या बैठकीनंतर मुख्यमंत्री या जागांच्या भवितव्याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक यांनी याआधी दिले होते संकेत

यापूर्वीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या जागांचा व्यावसायिक विकास करण्याचे संकेत दिले होते. ST महामंडळाकडे राज्यभरातील अनेक शहरांमध्ये बसस्थानके, बस आगारे आणि मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहेत. या जागांचा व्यावसायिक वापर करून महामंडळासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याचा सरकारचा विचार होता. त्यासाठी PPP मॉडेलचा वापर करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

यापूर्वी परिवहन विभागाच्या बैठकीत राज्यातील ST महामंडळाच्या जागांचा 72 पॅकेजमध्ये विकास करण्याचा आराखडा मांडण्यात आला होता. यामध्ये शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागांतील बसस्थानके व आगारांचा समावेश करण्याची योजना होती. जागांचे अ (A), ब (B) आणि क (C) अशा वर्गांमध्ये वर्गीकरण करून त्यांचे एकत्रित पॅकेज तयार करण्याचा प्रस्ताव होता. प्रत्येक पॅकेजमध्ये विविध प्रकारच्या मालमत्तांचा समावेश करून त्यांचा व्यावसायिक विकास करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती.

Pratap Sarnaik:  स्थानिक परिस्थिती लक्षात घेण्याच्या दिल्या होत्या सूचना

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी यापूर्वी झालेल्या बैठकीत जागांचा विकास करताना स्थानिक गरजा, व्यावसायिक व्यवहार्यता आणि भविष्यातील उत्पन्न यांचा विचार करण्याचे निर्देश दिले होते. तसेच आवश्यक ते बदल करून विकास प्रक्रियेला गती देण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

दरम्यान, उत्पन्न वाढवण्याच्या नावाखाली एसटीच्या मालकीच्या हक्काच्या जमिनी खासगी बिल्डरांच्या घशात घातल्या जात असल्याचा आरोप यावरून होण्याची शक्यता आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीनंतर फडणवीस नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Ladki Bahin Yojana: 'आधी योजना आणायची अन् नंतर नावे कापायची, हेच तर सरकारचं धोरण'; योजनेतून नावं बाद झाल्याने बीडमधील महिला नेत्यांसह 'लाडक्या बहिणी' संतापल्या!

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Rohit Pawar: '...पण आपण छत्रपतींचे वारस आहात, छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करता हे विसरु नये'; आमदार रोहित पवारांचा थेट मंत्री शिवेंद्रराजेंना सल्ला
'...पण आपण छत्रपतींचे वारस आहात, छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करता हे विसरु नये'; आमदार रोहित पवारांचा थेट मंत्री शिवेंद्रराजेंना सल्ला
Chhagan Bhujbal: नाशिक शहराला वाऱ्यावर सोडलंय का? खड्ड्यांमुळे 5 वा बळी गेल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक, म्हणाले, 'कुंभमेळा मंत्र्यांनी...'
नाशिक शहराला वाऱ्यावर सोडलंय का? खड्ड्यांमुळे 5 वा बळी गेल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक, म्हणाले, 'कुंभमेळा मंत्र्यांनी...'
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Embed widget